व्हॉटसअ‍ॅप हे सर्वात लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. व्हॉटसअ‍ॅपवरून मेसेज करणे, फाइल्स पाठवणे, कॉल – व्हिडीओ कॉल करणे अशा अनेक गोष्टी सहजरित्या करता येतात. त्यामुळे अनेकजण व्हॉटसअ‍ॅपवरून संवाद साधण्याला प्राधान्य देतात. व्हॉटसअ‍ॅपकडुनही युजर्सना आकर्षित करण्यासाठी सतत नवे फीचर्स लाँच केले जातात. असेच एक नवे फीचर लाँच करण्यात आले आहे. या फीचरचे नाव आहे ‘कॉल लिंक’. या फीचरच्या मदतीने ‘गूगल मीट’प्रमाणे व्हॉटसअ‍ॅप कॉलची लिंक शेअर करता येणार आहे.

कॉल लिंक हे फीचर याआधी आयओएस युजर्ससाठी उपलब्ध करण्यात आले होते. आता हे फीचर अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी रोल आऊट करण्यात आले आहे. या फीचरमुळे उपलब्ध होणाऱ्या लिंकचा वापर करून तुम्ही सहजरित्या कोणत्याही कॉल किंवा व्हिडीओ कॉलमध्ये सहभाग घेऊ शकता किंवा इतरांना तुमच्या कॉलची लिंक शेअर करून त्यांना आमंत्रित करू शकता.

Aloo Matara bhaji without oil
VIDEO : एकही थेंब तेल न वापरता बनवा बटाट्याची चमचमीत भाजी, ही सोपी रेसिपी लगेच नोट करा
The Best Place to Put Your Router For Strong Wi-Fi
WiFi Router: इंटरनेट खूपच स्लो चालतंय? वाय-फाय राउटरला ‘या’ ठिकाणी ठेवल्यास मिळेल सुपरफास्ट स्पीड
IB Recruitment 2024
IB Recruitment 2024: इंटेलिजन्स ब्युरोमध्ये ६६० पदांसाठी भरती; अशा प्रकारे करता येणार अर्ज
how to choose right sports bra these small 6 tips can help you find correct fitting
जिमसाठी पहिल्यांदाच स्पोर्ट्स ब्रा खरेदी करताय? मग ‘या’ सहा गोष्टींची काळजी घ्या

आणखी वाचा : WhatsApp चे प्रत्येक नवे फीचर सर्वात आधी तुम्हाला वापरता येणार; फक्त वापरा ‘ही’ ट्रिक

कसे वापरायचे ‘कॉल लिंक’ फीचर :

  • तुमचे व्हॉटसअ‍ॅप उघडून त्यात कॉल (कॉल्स) या सेक्शनमध्ये जा.
  • त्यामध्ये तुम्हाला सर्वात वर क्रिएट कॉल लिंक (Creat Call Link) हा पर्याय दिसेल, तो निवडा.
  • हा पर्याय निवडल्यावर तुमची कॉल लिंक तयार होईल.
  • यामध्ये तुम्ही कॉलचा प्रकार, म्हणजे कॉल किंवा व्हिडीओ कॉल यापैकी एक पर्याय निवडु शकता.
  • खाली देण्यात आलेल्या पर्यायाद्वारे तुम्ही ही लिंक कोणालाही शेअर करून त्यांना कॉलमध्ये समाविष्ट करू शकता.