iPhone 14 Biggest Discount: प्रत्येकजण आयफोन मॉडेलवरील सूटची वाट पाहत आहे. Apple ने सप्टेंबर २०२२ मध्ये त्यांच्या नवीन आयफोन १४ मालिकेचे अनावरण केले. जर तुम्हीही आयफोन १४ मालिका खरेदी करण्यासाठी सवलतीची वाट पाहत असाल तर एक उत्तम संधी आहे. पण आता तुम्ही आयफोन १४ स्मार्टफोन सवलतीत खरेदी करू शकता. आयफोन १४ सध्या सुमारे ५०,००० रुपयांच्या सवलतीसह खरेदी केला जाऊ शकतो. होय, हे खरे आहे परंतु या किंमतीत तुम्ही आयफोन १३ देखील घेऊ शकता. याविषयी सर्व काही जाणून घ्या…

iPhone १४ सवलत ऑफर (iPhone 14 Discount offer)

ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्टवरून आयफोन १४ सवलतीत खरेदी करता येईल. आयफोन १४ सध्या फ्लिपकार्टवर ७७,४०० रुपयांना घेता येईल. आम्ही तुम्हाला सांगतो की, सध्या अॅपलच्या वेबसाइटवरील किंमतीपेक्षा ही रक्कम कमी आहे. हा iPhone १४ अजूनही Apple च्या ऑनलाइन स्टोअरवर ७९,४०० रुपयांना विकला जात आहे. खरं तर हा वेरीअंट याच किंमतीत लॉन्च करण्यात आला होता. म्हणजेच अधिकृत किमतीत कोणताही बदल झालेला नाही.

वर्धा : शहरी तुलनेत ग्रामीण भागात टक्का वाढला, महिला मतदारांमध्ये निरुत्साह
Playoff equation in IPL 2024 Updates in Marathi
IPL 2024 Playoffs : सात पराभवानंतरही आरसीबीला प्लेऑफमध्ये पोहोचण्याची संधी, मुबंई देखील दावेदार, जाणून घ्या समीकरण
Which teams will qualify for playoffs
IPL 2024 : प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी इतके सामने जिंकणे आवश्यक, ‘या’ संघांच्या वाढल्या अडचणी
Birds mumbai, Birds suffer from heat,
मुंबई : वाढत्या उष्म्याचा पक्ष्यांना त्रास, १६ दिवसांमध्ये १०० हून अधिक पक्षी व प्राणी रुग्णालयात दाखल

( हे ही वाचा; खरेदी केलेला APPLE IPHONE खरा आहे की बनावट, हे कसे ओळखाल? फॉलो करा ‘या’ टीप्स)

याशिवाय एचडीएफसी बँक कार्डद्वारे फ्लिपकार्टवरून आयफोन १४ डिस्काउंटसह घेता येईल. एचडीएफसी वापरकर्त्यांना फोन घेतल्यावर कंपनी ५००० रुपयांचा कॅशबॅक देत आहे. या डिस्काउंटनंतर फोनची किंमत ७२,४०० रुपयांपर्यंत खाली येते. याशिवाय फ्लिपकार्टवरून फोन घेतल्यावर तुम्हाला एक्सचेंज डिस्काउंटही मिळू शकतो. ई-कॉमर्स साइट नवीन आयफोनच्या बदल्यात २०,५०० रुपयांपर्यंत सूट देत आहे .

हे लक्षात घेण्यासारखे आहे की २०,५०० रुपयांची सूट स्मार्टफोनच्या मॉडेलवर अवलंबून असते. तुम्हाला ज्या फोनची देवाणघेवाण करायची आहे त्या स्थितीवरच एक्सचेंज व्हॅल्यू दिली जाईल. फ्लिपकार्टवर वनप्लस, सॅमसंग आणि ऍपलच्या हाय-एंड फोनवर जास्तीत जास्त एक्स्चेंज सवलत मिळू शकते . Apple बद्दल बोलायचे झाले तर, जास्तीत जास्त सवलत फक्त प्रो मॉडेलवर मिळण्याची अपेक्षा आहे. वापरकर्ते फ्लिपकार्टला भेट देऊन सवलत आणि विनिमय मूल्य तपासू शकतात. तुम्हाला पूर्ण एक्सचेंज व्हॅल्यू मिळाल्यास, आयफोन १४ ५२,००० रुपयांपेक्षा कमी किंमतीत घेता येईल.

( हे ही वाचा: आधीच कोविड, त्यात चीनला बसू शकतो मोठा फटका; APPLE ‘या’ देशांमध्ये उत्पादन हलवणार असल्याची चर्चा)

iPhone १३ हा एक चांगला पर्याय आहे

आम्हाला विश्वास आहे की एक्सचेंज व्हॅल्यू पूर्ण न झाल्यास कंपनीच्या नवीनतम iPhone १४ पेक्षा iPhone १३ हा एक चांगला पर्याय असू शकतो. iPhone १३ Flipkart वर ६९,९९९ मध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. या आयफोन मॉडेलवर अतिरिक्त सवलत देखील उपलब्ध आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की iPhone १३ आणि १४ मध्ये फारसा फरक नाही. पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार iPhone १३ आणि १४ मधून कोणताही फोन निवडू शकता.