scorecardresearch

खरेदी केलेला APPLE IPHONE खरा आहे की बनावट, हे कसे ओळखाल? फॉलो करा ‘या’ टीप्स

तुमचा आयफोन हा खरा आहे की खोटा हे तुम्हाला तपासायचे असेल तर तुम्ही पुढील प्रकारे तपासू शकता.

खरेदी केलेला APPLE IPHONE खरा आहे की बनावट, हे कसे ओळखाल? फॉलो करा ‘या’ टीप्स
संग्रहित छायाचित्र

Tips to check real and fake iphone : आयफोन हा सर्वात लोकप्रिय फोन आहे. किंमत महाग असली तरी त्याचे फीचर्स हे ग्राहकांना त्यास खरेदी करण्यासाठी आकर्षित करतात. देशात आयफोनची मागणी वाढली असताना बनावट वस्तूंचा बाजारही फोफावत आहे. अलिकडेच नोएडा पोलिसांनी बनावट आयफोन १३ स्वस्त दरात विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे.

पीटीआयनुसार टोळीतील ३ सदस्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ६० बनावट आयफोन्स जप्त करण्यात आले आहेत. चोरटे दिल्ली येथून स्वस्त फोन घ्यायचे आणि नंतर हे बनावट मोबाइल फोन आयफोनच्या बॉक्समध्ये पॅक करून ते विकायचे. हे प्रकरण धक्कादायक आहे. म्हणून फोन निर्मिती कंपन्या ग्राहकांना फोन त्यांच्या अधिकृत रिटेलर्सकडून घेण्याचे आवाहन करतात. तुमचा आयफोन हा खरा आहे की खोटा हे तुम्हाला तपासायचे असेल तर तुम्ही पुढील प्रकारे तपासू शकता.

(Vivo Y02 भारतात लाँच, 1TB पर्यंत वाढवू शकता इंटरनल स्टोअरेज, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स)

१) आयफोनचा आयएमईआय क्रमांक तपासा

सर्व स्मार्टफोन्सना १५ ते १७ अंकी आयएमईआय क्रमांक मिळतो. सर्व्हिस प्रोव्हायडरकडून या क्रमांकाचा वापर उपकरणे ओळखण्यासाठी केला जातो. आयफोनचा आयएमईआय क्रमांक तपासण्यासाठी सेटिंग्स अंतर्गत जनरलमधील अबाऊटमध्ये आयएमईआय क्रमांक आहे की नाही ते तपासा. आयएमईआय क्रमांक नसल्यास तुमचा आयफोन कदाचित बनावट आयफोन असू शकतो.

आयफोन जवळ नसल्यास तुम्ही आयएमईआय क्रमांक ऑनलाइन तपासू शकता.

  • appleid.apple.com या संकेतस्थळाला भेट द्या.
  • डिव्हाइसमधील अ‍ॅपल आयडीद्वारे साईन इन करा.
  • आता डिव्हाइस सेक्शन सिलेक्ट करा. तुम्हाला सिरीज आणि आयएमईआय/एमईआयडी क्रमांक दिसून येईल. डिव्हाइस सिलेक्ट करा.
    जर तुम्ही नवीन आयफोन घेतला असेल तर आयफोनच्या सेटिंगमध्ये जाऊन आयएमईआय क्रमांक तपासा आणि तो बॉक्सवरील आयएमईआय क्रमांकाशी जुळवा.

२) फोनचे ऑपरेटिंग सिस्टिम तपासा

आयफोन आयओएस या ऑपरेटिंग सिस्टिमवर चालतो. बनावट आयफोनमध्ये आयओएस सोडून इतर ऑपरेटिंग सिस्टिम असू शकतो. यावरून खरे की बनावट याची ओळख करता येऊ शकते. यासाठी आयफोनमधील सेटिंगमध्ये जा, ओपन सॉफ्टवेअर टॅब उघडा आणि ऑपरेटिंग सिस्टिम तपासा. त्याचबरोबर, सफारी, हेल्थ हे अ‍ॅपलचे ओरिजिनल अ‍ॅप फोनमध्ये आहे की नाही हे तपासा.

(समुद्राच्या लाटांपासून तयार होणार वीज, आयआयटी मद्रासचे तंत्रज्ञान कसे करते काम? जाणून घ्या)

३) फोनची बॉडी तपासा

फोनच्या बॉडी तपासून तुम्ही फोन खरा आहे की बनावट आहे हे माहिती करू शकता. बनावट आयफोनच्या डिजाईनमध्ये त्रुटी असू शकतात. कॅमेरा मॉड्यूल, फ्रेम, नॉच तपासा. नवीन आयफोन मॉडेल मेटल आणि ग्लासने बनलेला आहे. तसेच आयफोनमध्ये यूएसबी टाइप सी पोर्ट मिळत नाही. त्याचबरोबर, तुम्हाला फोनबाबत कोणतीही शंका आली तरी अधिकृत अ‍ॅपल स्टोअरमध्ये आपला फोन तपासा.

४) फोनचे कव्हरेज तपासा

आयफोन कव्हरेज आयफोनच्या वॉरंटीबाबत माहिती देते. याद्वारे तुमचा फोन बनावट आहे की खरा, हे तुम्हाला तपासता येऊ शकते. यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.

(मस्तच! ‘IPHONE’ने कोणत्याही वस्तूचे करा मोजमाप, असे वापरा ‘हे’ भन्नाट फीचर)

  • mysupport.apple.com संकेतस्थळावर जा. अ‍ॅपल आयडीद्वारे साइन इन करा.
  • डिव्हाइस निवडा. अ‍ॅपल तुम्हाला हार्डवेअर दुरुस्ती आणि तांत्रिक सपोर्टसह आयफोनच्या सपोर्टबाबत माहिती देईल.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 06-12-2022 at 14:48 IST

संबंधित बातम्या