What is the price of iPhone 17 series?: अखेर बहुप्रतिक्षित आयफोन १७ सिरीज लाँच झाली आहे. अद्ययावत तंत्रज्ञान आणि नवनवीन वैशिष्ट्ये असलेल्या ॲपलच्या आयफोन १७चे अनावरण करण्यात आले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह अनेक देशांवर आयातशुल्क लागू केल्यानंतर सादर होणाऱ्या आयफोनवर त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता होती . मात्र अॅपलने आयफोनच्या किमतीत कोणतीही वाढ न करता ग्राहकाना दिलासा दिला आहे. तसेच या आयफोनमध्ये दिलेले फिचर्स पाहूनही आयफोन युजर्स खूश होणार आहेत. आयफोनमध्ये मॅकबुक इतके ताकदीने काम कणऱ्याची क्षमता यामध्ये असून चला तर मग आयफोन १७, आयफोन १७ एयर, आयफोन १७ प्रोची किंमत जाणून घेऊयात.
‘ट्रम्प टॅरिफ’चा आयफोन वर परिणाम नाहीच
अद्ययावत तंत्रज्ञान आणि नवनवीन वैशिष्ट्ये असलेल्या ॲपलच्या आयफोन १७चे आज, अनावरण करण्यात आले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासह अनेक देशांवर आयातशुल्क लागू केल्यानंतर सादर होणाऱ्या आयफोनवर त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता होती . मात्र एपलने आयफोनच्या किमतीत कोणतीही वाढ न करता ग्राहकाना दिला दिला आहे.
दमदार फिचर्ससह आयफोन 17 सिरीज लाँच; किंमत काय ? लगेच जाणून घ्या
आयफोन १७ – ७९९ डॉलर – भारतीय चलनात – ७०,४९६.८५
आयफोन १७ एयर – ९९९ डॉलर भारतीय चलनात – ८८,१४३.१२
आयफोन १७ प्रो – ११९९ डॉलर भारतीय चलनात – १,०५,७९३.१२
आयफोन १७ च्या सिरीजचे कॅमेरे आहेत खास
या जनरेशनमधील सर्वात मोठे अपडेट म्हणजे कॅमेरा सिस्टम. ॲपलनुसार, यात मागील बाजूस 48-मेगापिक्सेल “ड्युअल फ्यूजन” कॅमेरा सिस्टम देण्यात आले आहे, जो मुख्य कॅमेरा आणि टेलिफोटो कॅमेराचे फिचर्स एकत्र आणतो. यामध्ये 24-मेगापिक्सेल डिफॉल्ट रिझोल्यूशन आहे, ज्यामुळे इमेज फाइल्स लहान साईजमध्ये सेव्ह करता येतात, तसेच 2x ऑप्टिकल क्वालिटी टेलिफोटो देखील आहे. शिवाय, यात 48-मेगापिक्सेल फ्यूजन अल्ट्रावाईड कॅमेरा आहे, जो iPhone 16 च्या तुलनेत चारपट जास्त रिझोल्यूशनमध्ये इमेज कॅप्चर करू शकतो, असे ॲपलचे म्हणणे आहे.
अद्ययावत फोकस कंट्रोल, सेंटर स्टेज कॅमेऱ्यामुळे फोन न फिरवता उभे आडवे फोटो घेण्याची सोय आहे.यात मागील बाजूस 48-मेगापिक्सेल “ड्युअल फ्यूजन” कॅमेरा सिस्टम देण्यात आले आहे, जो मुख्य कॅमेरा आणि टेलिफोटो कॅमेराचे फिचर्स एकत्र आणतो. यामध्ये 24-मेगापिक्सेल डिफॉल्ट रिझोल्यूशन आहे, ज्यामुळे इमेज फाइल्स लहान साईजमध्ये सेव्ह करता येतात.
फिचर्स काय आहेत
डिस्प्ले
नवीन iPhone Air मध्ये 6.5-इंच ProMotion डिस्प्ले असून त्याचा रिफ्रेश रेट 120Hz पर्यंत आहे. यात ३,००० निट्स पीक ब्राइटनेस आहे. ॲपलच्या म्हणण्यानुसार, हे त्यांचं आतापर्यंतचं सर्वात मजबूत डिझाइन आहे, ज्यात टायटॅनियम फ्रेम दोन्ही बाजूंनी सिरॅमिक शिल्डची आहे.
A19 Pro प्रोसेसर
यात नवीन A19 Pro प्रोसेसर दिलेला आहे, जो आजवरचा सर्वात शक्तिशाली आयफोन चिप आहे. तसेच, C1x नावाचा ॲपल-बिल्ट मोडेम आहे, जो C1 पेक्षा दुपटीने जलद आहे. याशिवाय, यात नवीन N1 चिप डिझाइन आहे, ज्यामुळे Wi-Fi 7, Bluetooth 6 आणि Thread सपोर्ट मिळतो.