आपली अनेक कामे हल्ली स्मार्टफोनच्या मदतीने होतात. आपण आपले बजेट आणि आपल्याला हवे असणारे फीचर्स ज्यामध्ये असतील त्या कंपनीचा स्मार्टफोन खरेदी करत असतो. फीचर्समध्ये आपण स्टोरेज, आणि कॅमेरा तसेच बॅटरी यांचा परफॉर्मन्स तपासात असतो. अनेक कंपन्यांच्या फोनची तुलना आपण करतो आणि मगच कोणता फोन घ्यायचा हे ठरवतो. मात्र नुकताच iQOO ने Neo 7 Pro 5G हा आणि दुसरीकडे नथिंग कंपनीने आपला Nothing Phone (2) स्मार्टफोन भारतात लॉन्च केला आहे. फीचर्स, किंमत आणि स्पेसिफिकेशन्समध्ये कोणता स्मार्टफोन बेस्ट आहे याबद्दल जाणून घेऊयात.

iQOO Neo 7 Pro 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

iQOO Neo 7 Pro मध्ये वापरकर्त्यांना ६.७८ इंचाचा AMOLED फ्लॅट डिस्प्ले मिळणार आहे. ज्याला १२० Hz चा रिफ्रेश रेट मिळेल. या डिस्प्लेमध्ये फुल एचडी + रिझोल्युशन ऑफर करते. हा फोन Snapdragon 8+ Gen 1 चिपसेटला सपोर्ट करतो. यामध्ये फोनमध्ये कंपनीने वापरकर्त्यांना १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज ऑफर केले आहे. हा फोन अँड्रॉइड १३ वर आधारित FuntouchOS 13 वर चालतो. हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह येतो.

Peng Liyuan chats over tea with Vietnam's first lady
लेख : चिनी अध्यक्षपत्नीचे वाढते प्रस्थ
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
elon musk remove block function
मस्क यांचा नवीन निर्णय; ‘एक्स’वर एखाद्याला ब्लॉक केल्यानंतरही दिसणार पोस्ट, काय आहेत धोके?
amazon employee cut off
‘सायलेंट सॅकिंग’ म्हणजे काय? ॲमेझॉन आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यासाठी याचा वापर का करत आहे?
What is a Pager how it works and reasons why they may explode in marathi
What is a Pager: पेजर म्हणजे काय? लेबनानमध्ये पेजरचा स्फोट कसा काय झाला?
now even Apple is using AI
विश्लेषण : ॲपलचीही आता एआयवर भिस्त… पण या शर्यतीत उशीर झाला का?
import duty cut will boost gold jewellery retailers revenues surge by 22 to 25 pc this fiscal crisil report
आयात शुल्क कपातीमुळे सराफांना सुवर्णसंधी; महसुलात २५ टक्क्यांपर्यंत वाढीचा ‘क्रिसिल’चा अंदाज
Karan Aujla live show video
भर कॉन्सर्टमध्ये चाहत्याने फेकून मारला बूट, ‘तौबा तौबा’ फेम गायकानं केलं ओपन चॅलेंज, पाहा Video

हेही वाचा : iQOO Neo 7 Pro की Realme Narzo 60 Pro 5G: कोणता स्मार्टफोन ठरतो तुमच्यासाठी बेस्ट? फक्त ‘या’ पॉइंट्समधून समजून घ्या

Nothing Phone (2): स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

नथिंग फोन (२) मध्ये वापरकर्त्यांना ६.७ इंचाचा LTPO OLED डिस्प्ले मिळणार आहे. ज्याचा रिफ्रेश रेट हा १२० Hz इतका आहे. हा फोन Snapdragon 8+ Gen 1 चिपसेटद्वारे समर्थित आहे. यामध्ये कंपनीने १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेंज ऑफर केले आहे. हा फोन ऑप्टिकल इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह येतो.

iQOO Neo 7 Pro चा कॅमेरा

या फोनचा कॅमेरा हे प्रमुख आकर्षण असणार आहे. या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्स, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर मिळणार आहे. सेल्फी आणि व्हिडिओसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळणार आहे.

Nothing Phone (2): कॅमेरा

फोटोग्राफीसाठी नथिंग फोन (२) मध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात ५० मेगापिक्सलचा Sony IMX890 प्रायमरी सेन्सर आणि ५० मेगापिक्सलचा सेन्सरचा समावेश आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडिओसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळणार आहे.

iQOO Neo 7 Pro 5G

iQOO Neo 7 Pro 5G ची बॅटरी ८ मिनिटात ५० टक्के तर ३० मिनिटांमध्ये १०० टक्के चार्ज होऊ शकते. यामध्ये ५००० mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. जी १२०W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

हेही वाचा : VIDEO: प्री-ऑर्डरवर ३ हजारांचा डिस्काउंट, ५० मेगापिक्सल कॅमेरा; Nothing कंपनीकडून ‘हा’ स्मार्टफोन लॉन्च

Nothing Phone (2)

हा स्मार्टफोन अँड्रॉइड १४ आधारित NothingOS 2.0 वर चालतो. यात ४,७०० mAh क्षमतेची बॅटरी आणि त्याला ४५ W चा फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. केवळ २० मिनिटांमध्ये ० ते ५० टक्के इतका चार्ज होऊ शकतो असा कंपनीचा दावा आहे. चार्जिंगसाठी USB टाईप -सी पोर्ट देण्यात आला आहे.

iQOO Neo 7 Pro 5G किंमत आणि ऑफर्स

iQOO Neo 7 Pro 5G हा स्मार्टफोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. यातील ८जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३४,९९९ रुपयांमध्ये करण्यात आली आहे. तर १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेजच्या व्हेरिएंटची किंमत ३७,९९९ रुपये इतकी आहे. ग्राहक हा फोन Fearless Flame (ऑरेंज) आणि Dark Storm (निळा) या रंगांमध्ये खरेदी करू शकतात. तसेच या फोनची विक्री १५ जुलैपासून Amazon वर विक्रीसाठी उपलब्ध होईल. तसेच तो कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर देखील उपलब्ध असेल.

हेही वाचा : iQOO Neo 7 Pro की Realme Narzo 60 Pro 5G: कोणता स्मार्टफोन ठरतो तुमच्यासाठी बेस्ट? फक्त ‘या’ पॉइंट्समधून समजून घ्या

Nothing Phone (2) : भारतातील किंमत आणि उपलब्धता

Nothing Phone (2) फोन तीन रंगांमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. ८जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ४४,९९९ रुपये आहे. तसेच १२/२५६ जीबी स्टोरे व्हेरिएंटची किंमत ४९,९९९ रुपये आहे. तसेच १२/५१२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ५४,९९९ रुपये असेल. फोन (२) अ‍ॅक्सेसरीजमध्ये १,२९९ रुपयांची असणारी केस, ९९९ रुपयांचे स्क्रीन प्रोटेक्टर आणि २,४९९ रुपयांचे पॉवर अ‍ॅडॉप्टर यांचा समावेश आहे. तसेच नाथानं फोन (२) २१ जुलैपासून भारतात Flipkart वर दुपारी १२ वाजल्यापासून विक्रीसाठी उप्लब्ध असणार आहे.

नथिंग फोन (२) आता भारतात प्री-ऑर्डरसाठी मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध आहे. प्री-ऑर्डर ऑफरमध्ये Axix Bank आणि HDFC बँकेच्या क्रेडिट कार्डवर ३,००० रुपयांचा झटपट डिस्काउंट मिळेल. खरेदीदार फोन (२) ची केस ४९९ रुपये, स्क्रीन प्रोटेक्टर ३९९ रुपयांना, पॉवर अॅडॉप्टर १,४९९ रुपयांना ईअर (स्टिक) ४,२५० रुपयांना आणि ईअर ८,९९९ रुपयांना खरेदी करू शकतात.