करोना आणि लॉकडाऊनचा मोठा फटका हा भारतीय अंतराळ संशोधन संस्था – इस्त्रोलाही ( ISRO ) बसला. करोनाची दुसरी लाट ओसरत असली तरी इस्त्रोच्या मोहिमांना किती उशीर झाला आहे याचे चित्र स्पष्ट होत नव्हतं. राज्यसभेत प्रश्नोतराच्या तासाला उत्तर देतांना विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह यांनी इस्त्रोच्या मोहिमांची वस्तुस्थिती स्पष्ट केली आहे.

इस्त्रोच्या कृत्रिम उपग्रह प्रक्षेपण मोहिमा ह्या जरी विलंबाने होणार असल्या तरी महत्वकांक्षी समानवी ‘गगनयान’ मोहिम ( Gaganyaan Mission ) २०२३ मधेच होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे. करोनाचा या मोहिमेच्या तयारीवर फारसा परिणाम झाला नसल्याचं उत्तरात स्पष्ट करण्यात आलं आहे. भारताच्या संभाव्य अंतराळवीरांचे रशियामधील प्रशिक्षण, तसंच भारतातील मोहिमेसंदर्भातील तांत्रिक तयारी जाोराने सुरु असल्याचं जितेंद्र सिंह यांनी स्पष्ट केलं आहे. २०२३ मध्ये ही मोहिम होणार असून त्याआधी गगनयानची तयारी सिद्ध करणाऱ्या दोन मोहिमा होणार आहेत, त्यापैकी एका मोहिमेत एक मानवी रोबोटही पाठवला जाणार आहे.

Radio images of the Sun obtained by scientists pune news
शास्त्रज्ञांनी मिळवली सूर्याच्या रेडिओ प्रतिमा
vidarbh economic development marathi news loksatt
तांदळाच्या प्रजातींवर संशोधन संस्थेसाठी ‘वेद’ आग्रही
article about mpsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व – परीक्षास्वरूप आणि अभ्यासक्रम
mla dadarao keche bjp martahi news
मंत्रोच्चार, कलशपूजन व अभिषेक! पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेची पूर्वतयारी

काय आहे ‘गगनयान’ मोहिम ?

आत्तापर्यंत भारतासह विविध देशाच्या अंतराळवीरांनी अवकाश वारी केलेली आहे. असं असलं तरी फक्त रशिया, अमेरिका आणि चीन या तीन देशांनीच स्वबळावर म्हणजेच स्वतःच्या रॉकेटच्या – प्रक्षेपकाच्या सहाय्याने अवकाशात अंतराळवीरांना पाठवले आहे. आता चौथा देश म्हणून भारत या पंक्तित जाण्याचा प्रयत्न करणार आहे म्हणजेच स्बबळावर देशाच्या नागरीकाला अवकाशात पाठवणार आहे. या मोहिमेला ‘गगनयान’ हे नाव देण्यात आलं आहे. गगनयान मोहिमेसाठी अवकाशात जास्त वजन वाहून नेण्याची क्षमता असलेले GSLV Mk3 हे प्रक्षेपक – रॉकेट सज्ज आहे. तर अंतराळवीर ज्या यानातून प्रवास करणार आहेत ते यान – Crew Module च्या प्रत्यक्ष चाचण्या लवकरच सुरु होणार आहेत. अवकाशात जाणाऱ्या संभाव्य अंतराळवीरांचे प्रशिक्षण हे रशियात अंतिम टप्प्यात पोहचलं आहे. २०२३ वर्षात सुरुवातीला गगनयानच्या दोन प्राथमिक मोहिमा होतील ज्यामध्ये अंतराळवीराचा सहभाग नसेल तर इस्त्रोनेच तयार केलेला मावनी रोबोट अवकाश वारी करतील. तेव्हा सर्व काही सुरळीत पार पडलं तर २०२३ च्या अखेरीस भारतीय अंतराळवीर हा प्रत्यक्ष अवकाशात पोहचलेला असेल. आपल्या देशाच्या अंतराळवीरांना vyomanauts – व्योमनॉट्स असंही संबोधलं जाणार आहे हे विशेष.

गगनयान मोहिमेसाठी रशियाचे जरी तांत्रिक सहाय्या घेतलं जात असलं तरी भारतातील ५०० पेक्षा जास्त लहान, मोठ्या उद्योगांचा या मोहिमेत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष हातभार लागलेला आहे, सहभाग आहे हे विशेष. गगनयान मोहिमेसाठी आवश्यक स्पेस सूट हे रशियाकडून दिलं जाणार आहे.

शुक्र आणि सूर्याचा अभ्यास करण्यासाठी उपग्रह मोहिमा

दरम्यान २०२२ मध्ये शुक्र ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी इस्त्रो उपग्रह प्रक्षेपित करणार असल्याची माहिती राज्यसभेत देण्यात आली आहे. तर २०२३ च्या मध्यापर्यंत सूर्याचा अभ्यास करण्यासाठी ‘आदित्य’ नावाचा उपग्रह पाठवला जाणार असल्याचं उत्तरात स्पष्ट करण्यात आलं आहे. एवढंच नाही तर २०३० पर्यंत भारताचे अवकाश स्थानक कार्यरत झालेलं असेल या दृष्टीने पावलं टाकली जात असल्याची माहिती विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री जीतेंद्र सिंह यांनी दिली आहे.