Jio 83 Days Recharge Plan : मोबाइलमध्ये रिचार्ज असणे किती महत्त्वाचे आहे हे आज काय वेगळं सांगण्याची गरज नाही. त्यामुळे अनेक दूरसंचार कंपन्या आपल्या ग्राहकांसाठी नवनवीन रिचार्ज प्लॅन घेऊन येत असतात. अशातच भारतातील आघाडीची दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओ आपल्या युजर्सच्या गरजा पूर्ण करण्यासाठी रिचार्ज प्लॅनमध्ये सतत नवनवीन बदल करत असते. वाढता रिचार्ज खर्च लक्षात घेवून आता जिओने जास्त वैधता आणि ओटीटी सबस्क्रिप्शन असलेले प्लॅन सादर केले आहेत. तर आज आपण १,२९९ रुपयांच्या रिचार्ज प्लॅनबद्दल जाणून घेणार आहोत.
जिओच्या १,२९९ रुपयांच्या प्रीपेड रिचार्ज प्लॅनमुळे तुम्हाला वारंवार तुमचा मोबाइल फोन रिचार्ज करण्याची गरज भासणार नाही. कारण या प्लॅनमध्ये ८४ दिवसांची (सुमारे तीन महिने) वैधता कनेक्टिव्हिटी प्रदान करतो. या प्लॅनमध्ये दररोज दोन जीबी डेटा म्हणजेच एकूण १६८ जीबी डेटा दिला जातो. या प्लॅनमध्ये सर्व स्थानिक आणि एसटीडी नेटवर्कवर अमर्यादित व्हॉइस कॉलिंगदेखील समाविष्ट आहे, तसेच दररोज दोन जीबी डेटा मर्यादा संपल्यानंतर युजर्स ६४ केबीपीएसच्या कमी वेगाने इंटरनेटचा वापर सुरू ठेवू शकतात.
जिओचा १,२९९ रुपयांचा प्लॅन हा खऱ्या अर्थाने ५जी रिचार्ज प्लॅन आहे, ज्यामुळे ५जी युजर्स या प्लॅनसह अमर्यादित ५जी डेटाचा आनंद घेऊ शकतात. डिजिटल मनोरंजनाची वाढती मागणी ओळखून जिओने त्यांच्या १,२९९ रुपयांच्या प्लॅनमध्ये नेटफ्लिक्सचे मोफत सबस्क्रिप्शन दिले आहे, यामुळे युजर्सना नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शनसाठी वेगळे पैसे देण्याची गरज भासणार नाही; ज्यामुळे हा प्लॅन आणखी खास ठरतो आहे. याव्यतिरिक्त या प्लॅनमध्ये जिओ टीव्हीचे मोफत सबस्क्रिप्शन आणि विविध प्रकारच्या लाइव्ह टीव्ही चॅनेलची सुविधादेखील प्रदान केली आहे.