भारतीय सोशल मीडिया प्लॅटफॉर्म कू (Koo) ॲप जे एक्स (ट्विटर) चे स्पर्धक म्हणून चारवर्षांपूर्वी लाँच करण्यात आले होते. ते आता आर्थिक अडचणींमुळे व बाजारातील त्यांच्या चढ-उतारामुळे अखेर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे कू चार वर्षांच्या प्रवास आज येथेच थांबत आहे. कू (Koo) ॲपचे संस्थापक अप्रमेय राधाकृष्ण आणि मयंक बिदावतका यांनी आज बुधवारी LinkedIn वर पोस्ट शेअर करत निरोप घेतला आहे.

जिथे बहुतांश प्लॅटफॉर्म प्रामुख्याने इंग्रजीमध्ये आहेत. तिथे बहु-भाषिक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘कू’ ॲपचा (Koo) ने दहा भाषांमध्ये एक आकर्षक इन-अ‍ॅप ‘टॉपिक्स’ फिचर आणले होते. यामध्ये हिंदी, बांगला, मराठी, गुजराती, कन्नड, तमिळ, तेलगू, आसामी, पंजाबी आणि इंग्रजी आदी दहा भारतीय भाषांचा समावेश होता आणि असे करणारे ‘कू’ हे पहिले आणि एकमेव व्यासपीठ (ॲप) होते ; जे आता चार वर्षानंतर आता निरोप घेत आहे.

हेही वाचा…आदित्य-L1 ची पहिली सूर्यप्रदक्षिणा पूर्ण; कसा होता प्रवास, किती दिवस लागले? जाणून घ्या सविस्तर…

कू संस्थापक अप्रमेय राधाकृष्ण व मयंक बिदावतका यांनी LinkedIn वर पोस्ट शेअर करत लिहिलं की, “आम्हाला लोकांना त्यांच्या स्थानिक भाषांमध्ये जोडण्याचा एक चांगला मार्ग बनवायचा होता. बहुतेक जागतिक उत्पादनांवर अमेरिकनांचे (इंग्रजीचे) वर्चस्व आहे. भारताला अशा ठिकाणी स्थान मिळायला हवे असं आम्हाला वाटतं होते. २०२० मध्ये स्थापन झालेल्या कूने एक्सचा भारतीय पर्याय म्हणून त्वरीत युजर्सची पसंती मिळवली. सेलिब्रिटी आणि मंत्र्यांनी त्याचा मोठ्या प्रमाणावर प्रचार केला. तसेच खास गोष्ट अशी की, प्लॅटफॉर्म त्याच्या पिवळी चिमणी लोगोसाठी ओळखले जाऊ लागले. तसेच लाँचपासून ॲप जवळजवळ ६० दशलक्ष युजर्सनी डाउनलोड केला होता.”

कू का बंद झाला ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कू ॲपने ​​​​Accel व Tiger Global सारख्या गुंतवणूकदारांकडून ६० मिलियन डॉलरपेक्षा जास्त निधी उभारला होता. पण, अनप्रेडिक्टेबल मार्केट परिस्थिती व दीर्घकालीन भांडवली गुंतवणुक प्लॅटफॉर्मसाठी हानिकारक ठरली. कंपनी चांगली कामगिरी करू शकली नाही आणि एक जागतिक ब्रँड बनू शकला नाही ; हे स्वप्न कायम राहील असे संस्थापक म्हणाले आहेत. पण, याबरोबर राधाकृष्ण, बिदावतका यांनी त्यांच्या टीम, गुंतवणूकदार, युजर्सकडून मिळालेल्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञताही व्यक्ती केली आणि अशाप्रकारे आम्ही देशी ट्विटरची पिवळी चिमणीचा निरोप घेत आहोत ; अशी संस्थापकांनी पोस्ट लिहिली आहे.