scorecardresearch

Premium

अनोळखी कॉल्समुळे हैराण आहात? जाणून घ्या अँड्रॉइड फोनवर अज्ञात नंबर ब्लॉक करण्याची सोपी पद्धत

अँड्रॉइड जगात अनेक फोन निर्माते आहेत, त्यामुळे ही पद्धत वेगवेगळ्या कंपनीच्या उपकरणांवर वेगवेगळी असू शकते.

block numbers
स्मार्टफोनमधील उपलब्ध स्क्रीन आणि इंटरफेसनुसार अज्ञात क्रमांक ब्लॉक करण्याची पद्धत बदलू शकते.(प्रातिनिधिक फोटो)

अनोळखी मोबाईल नंबर अनेकदा अडचणींचे कारण ठरू शकतात. अशा परिस्थितीत जर तुम्हाला अँड्रॉईड फोनवर नको असलेले आणि अनोळखी नंबर ब्लॉक करायचे असतील तर यासंबंधी आपण एक सोपा उपाय जाणून घेऊया. गुगल यासाठी एक बाय डिफॉल्ट सेवा प्रदान करते. तथापि, अँड्रॉइड जगात अनेक फोन निर्माते आहेत, त्यामुळे ही पद्धत वेगवेगळ्या कंपनीच्या उपकरणांवर वेगवेगळी असू शकते. स्मार्टफोनमधील उपलब्ध स्क्रीन आणि इंटरफेसनुसार अज्ञात क्रमांक ब्लॉक करण्याची पद्धत बदलू शकते.

अँड्रॉइड फोनवर अज्ञात क्रमांक कसे ब्लॉक करायचे ?

– गुगल फोन अ‍ॅप डाउनलोड करावे.

Paytm Fastag
Paytm Fastag Deactivate कसं कराल? सहज-सोप्या पद्धती जाणून घ्या!
documentary filmmaking production intellectual exercise Dhananjay Bhawalekar art loksatta lokrang
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: बौद्धिक कसरत..
Radical changes
गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत अमूलाग्र बदल! धातूऐवजी सिरॅमिक सांध्याचा वापर ठरेल फायद्याचा
union budget 2024
अर्थसंकल्प समजून घेण्यापूर्वी ‘या’ Financial Terms जाणून घ्या, तुम्हाला सरकारचे नियोजन कळेल

– अ‍ॅप उघडून डायलर सर्च बारच्या वर उजव्या बाजूला असलेल्या तीन बिंदूंवर क्लिक करा.

– सेटिंग्सवर क्लिक करून ब्लॉक नंबरवर जावे.

– Unknown पर्याय सुरु करावे.

– लक्षात ठेवा, अँड्रॉइडमध्ये अज्ञात म्हणजे तुमच्या फोनमध्ये सेव्ह केलेले फोन नंबर नाहीत, तर जे तुमच्या कॉलर आयडीमध्ये खाजगी किंवा अज्ञात म्हणून फ्लॅश करतात त्यांच्यासाठी आहे.

सॅमसंग अँड्रॉइड फोनवर अनोळखी नंबर कसे ब्लॉक करायचे ?

– गुगल फोन अ‍ॅप उघडून डायलर सर्च बारच्या वर उजव्या बाजूला असलेल्या तीन बिंदूंवर क्लिक करा.

– सेटिंग्सवर क्लिक करून ब्लॉक नंबरवर जावे.

–  ब्लॉक अननोन/हिडन नंबर (Block unknown/ hidden numbers)वर क्लिक करून प्रायव्हेट आणि अनोळखी नंबर ब्लॉक करा.

शाओमी अँड्रॉइड फोनवर अनोळखी नंबर कसे ब्लॉक करायचे ?

– गुगल फोन अ‍ॅप उघडून डायलर सर्च बारच्या वर उजव्या बाजूला असलेल्या तीन बिंदूंवर क्लिक करा.

– सेटिंग्समध्ये जाऊन अननोनवर क्लिक करावे.

(वर दिलेली पद्धत MIUI १२.५वर आधारित स्मार्टफोनसाठी स्पष्ट करण्यात आली आहे. जर तुमच्या शाओमी फोनची आवृत्ती वेगळी असेल तर या पायऱ्यांमध्ये काही बदल असण्याची शक्यता आहे.)

अनोळखी नंबर ब्लॉक करण्याच्या डिफॉल्ट मार्गाव्यतिरिक्त, ट्रूकॉलर सारखे काही थर्ड पार्टी अ‍ॅप आहेत जे अज्ञात नंबर ब्लॉक करण्यात मदत करतात.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Learn the easy way to block unknown numbers on android phones pvp

First published on: 08-02-2022 at 19:54 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×