सध्या जागतिक आर्थिक मंदीचे कारण देत खर्चाचे प्रमाण कमी करण्यासाठी दिग्गज टेक कंपन्या मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. Apple , Microsoft , Meta आणि Google सह अनेक टेक कंपन्यांनी आतापर्यंत आपल्या हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. काही कंपन्यांनी तर दोन वेळा आपल्या कमर्चाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे.  मात्र फेसबुकचची मूळ कंपनी मेटा बाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. मेटाने या आधीही कर्मचाऱ्यांची कपात केली आहे आणि पुन्हा एकदा या कंपनीमध्ये कर्मचाऱ्यांची कपात झाली आहे.

मेटाने अलीकडेच ताळेबंदीची घोषणा केली आहे . ज्यामध्ये अतिरिक्त १०,००० कर्मचारी प्रभावित झाले आहेत. म्हणजेच मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी दोन्ही फेऱ्यांमध्ये मिळून २१,००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. यामध्ये ज्यांची नोकरी गेली आहे त्यांनी आपले अनुभव लिंकडेनवर शेअर केले आहेत.

हेही वाचा : Tech Layoffs: ‘Meta’ मध्ये दुसऱ्यांदा होणार तब्बल १० हजार कर्मचाऱ्यांची कपात; CEO म्हणाले, “आपल्या सर्वांना…”

मेटा कंपनीतील नोकरी गेलेल्या कर्मचाऱ्यांपैकी रिचर्ड ट्रॅन देखील एक कर्मचारी आहेत. त्यांनी आपली नोकरी गेलयावर आपले अनुभव लिंकडेनवर शेअर केले आहेत. रिचर्ड हे मेटामध्ये UX रिसर्चर होते. लिंकडेनवर पोस्ट शेअर करत रिचर्ड ट्रॅन म्हणाले, ”जो पर्यंत मी तिथे काम करत होतो तोवर तिथे मी नरक यातनाच भोगल्या आहेत. ”

तसेच या पोस्टमध्ये पुढे लिहिताना त्यांनी मेटा नोकरी करत असताना घालवलेला वेळ आणि त्यांना मिळाले अनुभव याबद्दल कंपनीचे आभार व्यक्त केले. या काळामध्ये मला शॉर्ट फॉर्म व्हिडीओ लँडस्केप व इतर बरीच गोष्टी शिकायला मिळाली असा दावा त्यांनी केला. कर्मचारी कपातीमध्ये ज्या कर्मचाऱयांची नोकरी गेली आहे त्याना रिचर्ड यांनी त्यांचे समर्थन दर्शवले.

हेही वाचा : VIDEO: दिल्ली येथे देशातील Apple चे दुसरे स्टोअर झाले सुरु; CEO टीम कुक यांनी हात जोडत केले ग्राहकांचे स्वागत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेटाने केलेल्या नवीन कर्मचारी कपातीच्या फेरीचा फटका UX डिझायनर्स, इंजिनिअर्स आणि टेक्निकल तिमत्वावर झाला आहे. मार्चमध्ये मेटा ने टाळेबंदीच्या दुसर्‍या फेरीची घोषणा केली जिथे त्यांनी हे देखील उघड केले की नोकरकपात ही तीन टप्प्यांमध्ये केली जाईल. त्यातील १०,००० जणांची कपात हा पहिला टप्पा असल्याचे दिसून येत आहे.