scorecardresearch

Apple च्या iOS साठी लवकरच लाँच होणार व्हाट्सअँपचे ‘हे’ फिचर

व्हाट्सअँप हे एक एकमेकांशी संवाद साधण्याचे माध्यम आहे .

Apple च्या iOS साठी लवकरच लाँच होणार व्हाट्सअँपचे ‘हे’ फिचर
WhatsApp – प्रातिनिधिक छायाचित्र /लोकसत्ता

व्हाट्सअँप हे एक एकमेकांशी संवाद साधण्याचे माध्यम आहे . मेटाच्या मालकीचे असलेले व्हाट्सअँपवरून आपले व्हॉइस आणि व्हिडीओ कॉल करणे , मेसेज करणे तसेच फोटो किंवा व्हिडीओ स्टेटसला ठेवणे असेअनेक फीचर्स यात आहेत. हे व्हाट्सअँप गेल्यावर्षी कॅमेरा मोड वर काम करत असल्याचा अहवाल व्हाट्सअँपशी संबंधित बातम्या व अपडेट्सच्या आढावा घेणाऱ्या वेबसाईटने दिला होता. अँड्रॉइडसाठी हे लाँच झाले असून आता Apple च्या iOS सिरीज साठी हे फिचर आणले जाणार आहे.

व्हाटसअँपकडून सध्या iOS साठी नवीन कॅमेरा मोडवर काम सुरु आहे. लवकरच ते फिचर लाँच केले जाणार आहे. भविष्यात युजर्स फक्त एका क्लिकवर व्हिडीओ मोडवर स्विच करू शकतो ज्यमुळे व्हिडीओ रेकॉर्ड करणे सोपे होणार आहे. गेल्या महिन्यात व्हाट्सअँपने ‘अ‍ॅक्सिडेंटल डिलीट’ फिचर लाँच केले होते. यामुळे युजरचे डिलीट झालेले मेसेज ५ सेकंदात रिकव्हर करता येत होते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 18-01-2023 at 16:20 IST

संबंधित बातम्या