सध्या अनेक दिग्गज टेक कंपन्या जागतिक आर्थिक मंदीचे कारण देत आपल्या हजारो कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. फेसबुक, इंस्टाग्राम, आणि व्हॉट्सअ‍ॅपची मूळ कंपनी असणारी मेटा कंपनीने घोषणा केली आहे की, पुढील आठवड्यापासून कर्मचाऱ्यांच्या कपातीची एक नवीन फेरी सुरु होईल.मेटामध्ये या आधी देखील कमर्चाऱ्यांची कपात करण्यात आली आहे. आता या नवीन फेरीमध्ये किती लोकांची नोकरी जाऊ शकते याबद्दल जाणून घेऊयात.

मेटा कंपनीचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी मे महिन्यात कर्मचारी कपात केली जाणार असल्याचे सांगितले होते. मीटिंगमध्ये या वेळेबद्दल स्पष्टता देण्यात आली होती. कर्मचारी कपातीचा प्रभाव हा मेटाच्या बिझनेस डिपार्टमेंटवर आणि हजारो कर्मचाऱ्यांवर होईल. याबाबतचे वृत्त Vox ने दिले.

हेही वाचा : ऑनलाईन ऑर्डरमध्येही ‘हापूस’ने मारली बाजी, ‘या’ अ‍ॅपवर भारतीयांनी एप्रिलमध्ये मागवले तब्बल २५ कोटींचे आंबे

वोक्सने कंपनी वाईड मिटिंगचे रेकॉर्डिंग प्राप्त केले , जिथे मेटाचे ग्लोबल अफेअर्सचे अध्यक्ष निक क्लेग म्हणाले, ”हा एक चिंतेचा आणि अनिश्चिततेचा काळ आहे. बरे झाले असते जर का माझ्याकडे सांत्वन किंवा आराम देण्याचा काही सोपा मार्ग असता.” क्लेग पुढे म्हणाले, आताची कपात ही एप्रिलमध्ये झालेल्या कपातीप्रमाणेच असणार आहे. जिथे मेटाच्या टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटमधून ४,००० कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली होती. कपातीच्या आधी मेटाचे प्रमुख अधिकारी वेळ आणि प्रभावित झालेल्या टीमबद्दल आणि प्रभावित कर्मचाऱ्यांना सूचित करतील.

मार्क झुकरबर्ग यांनी सांगितले होते की मी महिन्याच्या अखेरीस १० हजार लोकांना काढून टाकण्याची योजनेत आखली आहे. नोव्हेंबरमध्ये मेटाने ११,००० कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. मेटाने याआधीच सुमारे ४ हजार नोकऱ्या कमी केल्या आहेत. आगामी फेरीमध्ये ६ हजार नोकऱ्या कमी केल्या जाऊ शकतात.

हेही वाचा : AI च्या भविष्यातील आव्हानांबद्दल Google चे सीईओ सुंदर पिचाई यांनी दिली प्रतिक्रिया; म्हणाले, “त्याच्याशी जुळवून…”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेटाच्या प्रवक्त्याने कर्मचारी कपातीबाबत अधिक भाष्य करण्यास नकार दिला.आगामी कपातीच्या लाटेच्या जवळ असणारी अनिश्चितता कंपनीमध्ये आधीच असलेल्या आव्हानात्मक वातावरणात भर घालते. मात्र क्लेग यांनी अशा परिस्थितीमध्ये कर्मचाऱ्यांची लवचिकता आणि व्यावसायिकता याचे कौतुक केले.