scorecardresearch

स्मार्टफोन, विंडोज, नव्हे तर ‘Microsoft’ पैसा कमवतो कुठून? ‘हे’ आहे बक्कळ कमाईचे रहस्य

तुम्हाला या टेक दिग्गज कंपनीच्या कमाईबद्दल माहिती आहे का…? मग जाणून घ्या…

स्मार्टफोन, विंडोज, नव्हे तर ‘Microsoft’ पैसा कमवतो कुठून? ‘हे’ आहे बक्कळ कमाईचे रहस्य
मायक्रोसॉफ्ट कंपनीची कमाई (फोटो-संग्रहित छायाचित्र)

Microsoft Earning: आयटी (माहिती-तंत्रज्ञान) व्यवसायात कार्यरत असलेल्या मोठ्या दिग्गज कंपन्यांबद्दल सर्वांना माहिती आहे. Microsoft, Apple, Amazon आणि Google या कंपन्यांच्या कमाईबद्दल आपण बरेच काही ऐकत असतो. अनेकदा या कंपन्यांच्या जॉब, पॅकेज आणि कमाईबद्दल चर्चा होते. कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना चांगल्या पॅकेजवर नियुक्त करतात. अशा स्थितीत कंपन्यांची कमाई सुद्धा मोठी होणार हे उघड आहे. पण तुम्हाला या टेक दिग्गज कंपनीच्या कमाईबद्दल माहिती आहे का…?

Apple ची बहुतेक कमाई हार्डवेअर उत्पादनांमधून येते. तर गुगल इंटरनेट आणि सॉफ्टवेअर मधून कमाई करते. मायक्रोसॉफ्टबद्दल बोलायचे तर मायक्रोसॉफ्टकडे देखील त्याच्या उत्पन्नाचे अनेक स्त्रोत आहेत. चला तर जाणून घेऊया मायक्रोसॉफ्टच्या उत्पन्नाचे स्रोत कोणकोणते आहेत.

(हे ही वाचा : ट्विटर युजर्संना मिळणार भन्नाट फीचर, आता दुसऱ्यांचे आवडलेले ट्विट करा तुमच्याकडे सेव्ह )

स्मार्टफोन बाजारात फ्लॉप झाली कंपनी

सत्या नाडेला यांनी जेव्हा मायक्रोसॉफ्टच्या सीईओपदाची सूत्रे हाती घेतली तेव्हा कंपनीसमोर अनेक आव्हाने होती. विंडोज फोनची बाजारपेठ जवळपास संपली होती आणि स्मार्टफोन बाजारात उतरण्याच्या कंपनीच्या प्रयत्नांना मोठा धक्का बसला.

मात्र, कंपनीने आपली मार्केटिंग स्ट्रॅटेजी बदलली आणि पुन्हा एकदा उभी राहिली. मायक्रोसॉफ्टने स्मार्टफोन व्यवसायात आश्चर्यकारक कामगिरी केली नाही, परंतु ब्रँडने त्याच्या क्लाउड सेवा आणि इतर सॉफ्टवेअर उत्पादनांचा पोर्टफोलिओ मजबूत केला. आज, कंपनीच्या कमाईपैकी ३१ टक्के (बहुतेक) क्लाउड सेवांमधून येतो.

मायक्रोसॉफ्टचे उत्पन्नाचे स्रोत

मायक्रोसॉफ्ट केवळ सॉफ्टवेअरच नव्हे तर डिव्हाइस, विंडोज आणि क्लाउड सेवेतूनही कमाई करते. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, मायक्रोसॉफ्टच्या कमाईचा मोठा हिस्सा क्लाउड सेवांमधून येतो.

(हे ही वाचा : भन्नाट! दोन महिने मिळणार फ्री इंटरनेट; ‘या’ कंपनीने ग्राहकांसाठी आणली अनोखी ऑफर )

मायक्रोसॉफ्टची क्लाउड सेवा काय आहे?

मायक्रोसॉफ्ट क्लाउड सेवा ‘Microsoft Azure’ म्हणून ओळखली जाते. हे क्लाउड कॉम्प्युटिंग प्लॅटफॉर्म आणि पायाभूत सुविधा आहे जे व्यवसायांना अॅप्स तयार करण्यास आणि ते व्यवस्थापित करण्यास अनुमती देते. इतकंच नाही तर व्हर्च्युअल मशीन, स्टोरेज आणि डेटाबेसची सुविधाही यात देण्यात आली आहे.

याशिवाय कंपनीच्या कमाईत कार्यालयीन उत्पादनांचा वाटा २४ टक्के आहे. कठीण काळात, कंपनीच्या कार्यालयीन उत्पादनांनी त्यांना बाजारात टिकून राहण्यास मदत केली. आता सत्या नाडेलामुळे तुम्हाला सॅमसंग आणि इतर ब्रँडच्या फोनमध्ये मायक्रोसॉफ्ट ऑफिसची उत्पादने दिसतात. याशिवाय, कंपनीने मायक्रोसॉफ्ट टीम्स देखील मजबूत केले आहेत.

Ooredoo ने कतारमध्ये फोन सेवा म्हणून Microsoft Teams लाँच केले आहे. म्हणजेच वापरकर्त्यांना फुल प्रूफ फोन सेवा मिळेल. यामध्ये व्हिडीओ कॉलिंगपासून ते ऑडिओ कॉलिंग, मेसेजिंगपर्यंतच्या सुविधा उपलब्ध आहेत. मात्र, ते केवळ व्यवसायांसाठी सुरू करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 22-01-2023 at 13:17 IST

संबंधित बातम्या