काही दिवसांपूर्वी गुगलने काही अ‍ॅप्सवर बंदी घातली होती. आता गुगल जवळपास ९ लाख अ‍ॅप्स काढून टाकण्याचा विचार करत आहे. यापैकी काही अ‍ॅप्स तुम्ही डाउनलोड केलेले असतील. त्यामुळे थोडं सावध राहा, कारण युजर्सच्या सुरक्षेसाठी कंपनीला असा निर्णय घ्यावा लागला आहे. आज आपण गुगलच्या या निर्णयाबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया.

जे अ‍ॅप्स त्यांचे अपडेट्स जाहीर करत नाहीत, अशा ९ लाख अ‍ॅप्सना गुगल, प्ले स्टोरवरून काढून टाकण्याच्या तयारीत आहे. अँड्रॉइड ऑथॉरिटीच्या म्हणण्यानुसार, असे केल्याने गुगल अ‍ॅप स्टोअरवरील अ‍ॅप्सची संख्या एक तृतीयांश कमी होईल. यापूर्वी, अ‍ॅपलने देखील आपल्या प्ले स्टोरवरून असे अ‍ॅप्स काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता, ज्यांनी गेल्या दोन वर्षांपासून कोणतेही अपडेट जारी केले नव्हते. अ‍ॅपलनेही त्या सर्व अ‍ॅप निर्मात्यांना ईमेल पाठवून याची माहिती दिली होती.

आता अ‍ॅप न उघडताच होणार पेमेंट; जाणून घ्या Google Pay चे नवे फीचर

सिनेटच्या म्हणण्यानुसार, गुगल आणि अ‍ॅपल त्यांच्या वापरकर्त्यांच्या संरक्षणासाठी ही पावले उचलत आहेत. गुगल ते अ‍ॅप्स आपल्या प्लॅस्टोरवरून हाईड करेल, ज्यांचे अपडेट रिलीझ झालेले नाहीत. असे केल्याने, वापरकर्ते ते अ‍ॅप्स डाउनलोड करू शकणार नाहीत.

अहवालानुसार, हे जुने अ‍ॅप्स अँड्रॉइड आणि आयओएसमधील बदल, नवीन एपीआय आणि सुरक्षा वाढविण्यासाठी नवीन पद्धतींचा फायदा घेत नाहीत. या कारणास्तव, जुने अ‍ॅप्स सुरक्षिततेच्या दृष्टीने असुरक्षित आहेत. मात्र, नवीन अ‍ॅप्समध्ये ही कमतरता नाही, असे कंपनीचे म्हणणे आहे.