एचएमडी ग्लोबलने इंडोनेशियामध्ये नोकिया ब्रँडसह एक नवीन स्वस्त ‘Nokia T21’ हा टॅबलेट लाँच केला आहे. या टॅबलेटची घोषणा काही महिन्यांपूर्वी झाली होती आणि ते आता इंडोनेशियामध्ये खरेदीसाठी उपलब्ध झाले आहे. नवीन Nokia T21 टॅबलेटमध्ये काय खास असेल व त्याची किंमत काय असेल, जाणून घेऊया सर्व काही…

Nokia T21 टॅबलेट ‘असा’ असेल खास

Nokia T21 या नवीन टॅबलेटमध्ये १२८ जीबी पर्यंत स्टोरेज आणि १०.३६-इंच स्क्रीन सारखी वैशिष्ट्ये आहेत. अलीकडे, नोकियाने इंडोनेशियामध्ये दोन नवीन एंट्री-लेव्हल स्मार्टफोन Nokia C21 Plus आणि Nokia C31 लाँच केले आहेत.

Hyundai Aura
बाकी कंपन्या पाहतच राहिल्या; देशातील बाजारात ‘या’ स्वस्त सेडान कारचा जलवा; झाली दणक्यात विक्री, मायलेज २२ किमी
Tata Punch Car sale
टाटाच्या ‘या’ सर्वात स्वस्त SUV नं Wagon R, Dzire चं वर्चस्व संपवलं? झाली दणक्यात विक्री, मायलेज २६ किमी
Essel Propack Limited Attractive durable quality in packaging
वेष्टनांतील आकर्षक, टिकाऊ गुणवत्ता
World's youngest billionaire List By Forbes
१९ वर्षीय तरुणी ठरली जगातील सर्वात तरुण अब्जाधीश, किती आहे संपत्ती? भारतात हा मान कुणाला मिळाला, हे ही पाहा

बॅटरी

सॉफ्टवेअरसाठी Nokia T21 टॅबलेटमध्ये Android 12 ऑपरेटिंग सिस्टम उपलब्ध आहे. कंपनीने या डिव्हाइसमध्ये दोन वर्षांसाठी अँड्रॉइड अपग्रेड आणि तीन वर्षांसाठी मासिक सुरक्षा अद्यतनांचे वचन दिले आहे. या Nokia टॅबलेटला पॉवर देण्यासाठी, ८,२००mAh बॅटरी उपलब्ध आहे जी १८W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

(आणखी वाचा : Jio Welcome Offer rolling out: जीओ वापरकर्त्यांसाठी भन्नाट ऑफर! आता मिळणार 5G सेवा मोफत; जाणून घ्या कसं?)

स्टोरेज

Nokia T21 बनवण्यासाठी मजबूत अॅल्युमिनियम बॉडी वापरली गेली आहे आणि टॅबलेटमध्ये ६० टक्के पुनर्नवीनीकरण केलेले प्लास्टिक कव्हर आहे. या टॅबलेटमध्ये २००० x १२०० पिक्सेल रिझोल्यूशनसह १०.३६ इंच IPS LCD स्क्रीन आहे.

Nekia T21 टॅबलेटमध्ये UniSoc T612 ऑक्टा-कोर प्रोसेसर आणि Mali-G57 GPU देण्यात आला आहे. नोकियाच्या या टॅबलेटमध्ये ४ जीबी रॅम आहे तर ६४ जीबी आणि १२८ जीबी इनबिल्ट स्टोरेज पर्याय उपलब्ध आहेत.

कॅमेरा

फोटोग्राफीबद्दल बोलायचे झाले तर Nokia T21 मध्ये LED फ्लॅशसह ८ मेगापिक्सेल ऑटोफोकस रियर कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी हँडसेटमध्ये ८-मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे.

Nokia T21 टॅबलेटची किंमत

Nokia T21 टॅबलेट ग्रे कलरमध्ये उपलब्ध आहे. त्याची किंमत ३२९९००० इंडोनेशियन रुपिया (सुमारे १७,००० रुपये) आहे. डिव्हाइसची विक्री डिसेंबरमध्ये सुरू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.