OnePlus Green Line Worry-Free Solution : वनप्लस, सॅमसंग, नथिंग कंपनीच्या प्रीमियम फीचर्सच्या स्मार्टफोन्सच्या ग्राहकांना मोबाईलच्या स्क्रीनवर ‘ग्रीन लाइन’ येत होती. जेव्हापासून ग्रीन लाइन मोबाईलच्या स्क्रीनवर येणार हे हळूहळू सगळ्या युजर्सना कळू लागले. तेव्हापासून प्रत्येक स्मार्टफोन युजरला काळजी वाटते की, पुढचा नंबर आपल्या फोनचा तर नसणार ना? कारण- फोनच्या डिस्प्लेवर ग्रीन लाइन कधी दिसेल याविषयी काहीही सांगता येत नव्हतं. पण, आता तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. कारण- वनप्लसने (OnePlus) ने AMOLED डिस्प्लेवरील सतत येणाऱ्या ग्रीन लाइन समस्येचे निराकरण करण्यासाठी एक नवीन उपक्रम जाहीर केला आहे (Lifetime Warranty For Green Line).

“OnePlus Green Line Worry Free Solution” या डब केलेल्या प्रोग्राममध्ये ॲडव्हान्स डिस्प्ले तंत्रज्ञान, रिगोरोस (rigorous) क्वालिटी कंट्रोल आणि भारतात विकल्या जाणाऱ्या सर्व OnePlus स्मार्टफोन्ससाठी लाईफटाइम वॉरंटी दिली आहे. OnePlus India चे सीईओ रॉबिन लिऊ म्हणाले की, या समस्येला तांत्रिक उपायांसह प्रतिसाद देणारा OnePlus हा पहिला ब्रॅण्ड आहे. आमच्या तंत्रज्ञानावर आणि युजर फर्स्ट अप्रोचवर आमचा विश्वास दाखवून आम्ही भारतात लाईफटाइम वॉरंटी देणारे पहिले आहोत (Lifetime Warranty For Green Line).

Image of an iPhone with a USB-C port or a related graphic
iPhone युजर्सची चिंता वाढवणारी बातमी! यूएसबी-सी पोर्टद्वारे हॅक होऊ शकतात फोन, सुरक्षा संशोधकाचा दावा
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
Samsung Galaxy S25 series arriving on January 22
‘Samsung Galaxy S Series’ साठी प्री-बुकिंग कशी करायची? जाणून घ्या प्रोसेस आणि फायदे
Two rickshaws collided after minor driver lost control of tempo
अल्पवयीन चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने दोन रिक्षांना धडक
IPL 2025 Time Table
IPL 2025 : ठरलं! ‘या’ दिवसापासून रंगणार आयपीएलचा थरार, पहिला सामना ‘या’ तारखेला होणार
Maha Kumbh Mela 2025
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभ झाला डिजिटल; AI आणि ड्रोन्सची करडी नजर, शिवाय बरेच काही!
Pune will soon be known as an electronic cluster says Ashwini Vaishnav
पुण्याची ओळख लवकरच ‘इलेक्ट्रॉनिक क्लस्टर’, काय म्हणाले अश्विनी वैष्णव?
Maha Kumbhmela 2025
Maha Kumbh Mela 2025: १४४ वर्षांनंतर येणारा महाकुंभमेळा का महत्त्वाचा? कारण काय?

उष्णता आणि आर्द्रता यांसारख्या पर्यावरणीय आव्हानांना तोंड देण्यासाठी वनप्लसने पीव्हीएक्स मटेरीयलचा (PVX materials) वापर करून एन्हान्स्ड एज बॉण्डिंग लेयर (Enhanced Edge Bonding Layer) सादर केले आहे. हे मटेरियल ओलावा आणि ऑक्सिजनच्या प्रवेशास प्रतिबंध करते आणि डिस्प्लेला अधिक टिकाऊपणा देतो. त्यामुळे कालांतराने ग्रीन लाइन (हिरव्या रेषा) दिसण्याची शक्यता लक्षणीयरीत्या कमी होऊ शकते. सर्व AMOLED डिस्प्ले असणाऱ्या युजर्सना ही समस्या उद्भवते. पण, OnePlus ने त्यांचे नवीन तंत्रज्ञान सर्व विभागांमध्ये उपलब्ध करून देण्याचे वचन दिले आहे.

हेही वाचा…फक्त रॅम नाही, भरपूर स्टोरेजपण देणार; OnePlus 13 ‘या’ तारखेला भारतात लाँच होणार!

OnePlus म्हणते की, १८० पेक्षा जास्त चाचण्या सुरू आहेत, ज्यात “डबल ८५” चाचणीचा समावेश आहे, जे AMOLED डिस्प्ले ८५ डिग्री सेल्सियम (85°C) तापमान आणि ८५ टक्के आर्द्रतेमध्ये दाखवते. या चाचण्या विश्वासाची हमी देण्यासाठी वास्तविक-जगातील परिस्थितीचे अनुकरण करतात आणि त्यामुळे प्रदर्शन समस्या कमी करण्यात मदत होते.

लाईफटाइम वॉरंटी

स्मार्टफोनसाठी प्रथमच OnePlus त्यांच्या जुन्या आणि नवीन सर्व मॉडेल्सना ग्रीन लाइन समस्यांविरुद्ध लाईफटाइम वॉरंटी (Lifetime Warranty For Green Line) देत आहे. त्यामुळे प्रत्येक OnePlus युजरला आता दिलासा मिळणार आहे, असे म्हणायला हरकत नाही. “हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलून आम्ही युजर्सच्या डिव्हायसेसना लाईफटाइम वॉरंटी ऑफर देत आहोत”, असे सीईओ रॉबिन लिऊ म्हणाले.

OnePlus Green Line Worry-Free Solution हा प्रोजेक्ट Starlight चा एक भाग आहे, जो सहा हजार कोटी रुपयांचा उपक्रम आहे, ज्याचा उद्देश पुढील तीन वर्षांमध्ये भारतात इनोव्हेशनचा वेग वाढवणे हा आहे. डिव्हायसेसचा टिकाऊपणा सुधारण्यासाठी आणि ग्राहक सेवा वाढविण्याकरिता भारतीय बाजारपेठेसाठी तयार असलेली फीचर्स सादर करण्यासाठी हा उपक्रम निश्चित करण्यात आला आहे. वनप्लस १३ (OnePlus 13) जानेवारी २०२५ मध्ये लाँच होणार आहे. त्याआधी ही घोषणा (Lifetime Warranty For Green Line) करण्यात आली आहे.

Story img Loader