Oppo ही कंपनी भारतात Oppo A78 5G लाँच करण्यासाठी सज्ज झाला आहे. कंपनीने अलीकडेच हे डिव्हाईस मलेशियामध्ये लाँच केले आहे. यामध्ये ९० Hz रिफ्रेश रेट येतो. यात ६.५६ इंचाचा एचडी प्लस एलसीडी या स्मार्टफोन्समध्ये येतो. हे ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी ७०० चिपसेट आणि Mali-G7 MC2 GPU द्वारे समर्थित आहे. या डिव्हाईसची बॅटरी ५०००mAh क्षमतेची असून त्याची चार्जिंगची क्षमता ३३ वॅट आहे.

ओप्पो ए ७८ अलीकडेच मलेशियात लाँच करण्यात आला. या डिव्हाईसची रॅम ८ जीबी आहे आणि १२८ जीबी स्टोरेज येते. या फोनच्या कॅमेराबाबत बोलायचे झाल्यास त्याचा कॅमेरा ५० मेगापिक्सल आणि २ मेगापिक्सल मोनोक्रोम सेन्सर असलेला कॅमेरा येतो. ड्युअल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी स्मार्टफोनमध्ये ८ मेगापिक्सल कॅमेरा येतो.

हेही वाचा : Apple CEO Salary : अ‍ॅपलचे CEO टीम कुक यांच्या पगारात ४० टक्क्यांची कपात; जाणून घ्या कारण

ओप्पो कंपनीने गुरुवारी भारतात Oppo A78 5G लाँच करण्याची तारीख ट्विट करत जाहीर केले आहे. हा स्मार्टफोन १६ जानेवारी रोजी भारतात लाँच होणार आहे. कंपनीने या स्मार्टफोन्सची किंमत अद्याप उघड केलेली नाही. परंतु याची किंमत सुमारे १९,००० असू शकते.