scorecardresearch

Samsung चं टेन्शन वाढलं, Oppo चा दमदार FLIP फोन बाजारात, तब्बल ४ लाख वेळा…

सॅमसंगला आता फ्लिप टेक्नॉलॉजीमध्ये जोरदार टक्कर देण्यासाठी ओप्पोने नवीन फोल्डेबल फोन लॉन्च केला आहे.

Oppo Find N2 Flip v samsung flip news
Oppo Find N2 Flip – संग्रहित छायाचित्र / द इंडियन एक्सप्रेस

सध्या भारतीय बाजारपेठेत सॅमसंगचे अनेक फ्लिप फोन उपलब्ध आहेत. अनोख्या डिजाईनमुळे हे फीचर सध्या चर्चेत आहे. मात्र, सॅमसंगला आता फ्लिप टेक्नॉलॉजीमध्ये जोरदार टक्कर देण्यासाठी ओप्पोने नवीन फोल्डेबल फोन लॉन्च केला आहे. कंपनीचा फोल्डेबल फ्लिप फोन बुधवारी Oppo Find N2 Flip ला जागतिक बाजारपेठेत लंडनमधील एका इव्हेंट दरम्यान लॉन्च करण्यात आले हा फोन अनेक खास फीचर्ससह लॉन्च करण्यात आला आहे, जो या सेगमेंटमध्ये सॅमसंगच्या फ्लिप फोनला टक्कर देऊ शकतो. Oppo Find N2 Flip फोनची किंमत , फीचर्स आणि कशाप्रकारे सॅमसंगला टक्कर देऊ शकतो हे जाणून घेऊयात.

हेही वाचा : Elon Musk यांनी गेल्या वर्षात दान केले तब्बल ‘इतक्या’ किंमतीचे शेअर्स, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Oppo Find N2 Flip चे फिचर्स

Oppo Find N2 Flip मध्ये कंपनीने ६.८ इंचाचा फोल्डिंग AMOLED स्क्रीन दिली असून याचा कव्हर डिस्प्ले हा ३. २६ इंचाचा आहे. या फोनची जाडी फक्त ७.४५ मिमी इतकी आहे त्यामुळे त्याचे डिझाईन आणि रचना खूपच आकर्षक आहे. ओप्पो कंपनीने आपल्या या फोल्डेबल फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला असून यामध्ये Sony IMX 890 सेन्सर येतो. कंपनीने हे Hasselblad सोबत डेव्हलप केले आहे. तसेच यामध्ये ८ मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड लेन्स आहे. वापरकर्त्यांना या फोनमध्ये सेल्फी कॅमेरा हा ३१ मेगापिक्सलचा मिळणार आहे.

Oppo Find N2 Flip – संग्रहित छायाचित्र / द इंडियन एक्सप्रेस

हेही वाचा : स्मार्टफोन घेताय, पाहा ही ऑफर, 5G स्मार्टफोनवर मिळतोय 90 हजारांचा डिस्काउंट, जाणून घ्या सविस्तर

या फोल्डेबल फोनमध्ये MediaTek Dimensity 9000+ हा प्रोसेसर येतो. यामध्ये १६ जीबी रॅम आहे आणि ५१२ जीबी पर्यंत स्टोरेज वाढवता येते. हा फोन Android 13 ColorOS 13 वर आधारित कस्टम ऑपरेटिंग सिस्टीमसह येतो. मुख्य म्हणजे हा फोन ५जी नेटवर्क कनेक्टिव्हिटी असलेला फोन आहे. Oppo च्या Oppo Find N2 Flip या फोल्डेबल फोनमध्ये वापरकर्त्यांना ४३००mAh इतकी बॅटरी मिळणार आहे. तसेच यामध्ये ४४ वॅटचे फास्ट चार्जर मिळणार आहे.

हेही वाचा : Elon Musk यांनी गेल्या वर्षात दान केले तब्बल ‘इतक्या’ किंमतीचे शेअर्स, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

Oppo Find N2 Flip ची किंमत

Oppo Find N2 Flip हा फोल्डेबल फोन ओप्पोने लॉन्च केला आहे. ज्याची किंमत ही ८४९ पौंड इतकी आहे. त्यामध्ये ८जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटच्या मॉडेलची भारतातील किंमत सुमारे ८०,००० रुपये आहे. भारतात हा फोन तुम्ही ८०,००० रुपयांना खरेदी करू शकणार आहात. तर १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज असलेल्या व्हेरिएंटच्या टॉप मॉडेलची किंमत ही ९०,००० रुपये असणार आहे. भारतामध्ये फोन खरेदी करू शकणार आहात.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-02-2023 at 10:41 IST
ताज्या बातम्या