सध्या प्रत्येकजण स्मार्टफोन वापरतो. प्रत्ययेकाची बरीचशी कामे ही फोनच्या मदतीने होत असतात. भारतात अनेक मोबाइल कंपन्या आप फीचर्स आणि अपडेट असलेले स्मार्टफोन बाजारात लॉन्च करत असतात. आज आपण नुकत्याच लॉन्च झालेल्या पोको कंपनीचा M6 Pro आणि मोटोरोला कंपनीचा Moto G14 या दोन फोनमधील तुलना पाहणार आहोत. फीचर्स,किंमत आणि अन्य गोष्टींमध्ये कोणता स्मार्टफोन चांगला आहे हे जाणून घेणार आहोत.

Poco M6 Pro 5G: फीचर्स

शाओमी सब ब्रँड असलेल्या कंपनीने या ५ जी स्मार्टफोनला ६.७९ इंचाच्या FHD + डिस्प्लेसह लॉन्च केले आहे. ज्याचा रिफ्रेश रेट हा ९० Hz आहे. याच्या संरक्षणासाठी फोनमध्ये गोरिला ग्लास ३ लेयर मिळते. हा फोन Qualcomm Snapdragon 4 Gen 2 SoC ने सुसज्ज आहे. हा अँड्रॉइड १३ आधारित MIUI 14 आउट-ऑफ-द-बॉक्स चालतो आणि ३ वर्षांच्या सेफ्टी अपडेटसह २ प्रमुख OS अपडेटचे वचन देते.

हेही वाचा : २० हजारांपेक्षा कमी किंमतीमध्ये लॉन्च झाला Samsung चा ‘हा’ स्मार्टफोन, मिळणार इन्स्टंट डिस्काउंट

Moto G14 : फीचर्स

Moto G14 मध्ये वापरकर्त्यांना ६.५ इंचाचा फुल एचडी + एलसीडी डिस्प्ले मिळणार आहे. ज्यात सेल्फीसाठी पंच होल कट आऊट आहे. या फोनला nisoc T616 चिपसेट आर्म माली-G57 MPI GPU चा सपोर्ट देण्यात आला आहे. यात ४जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मिळते. याचे स्टोरेज मायक्रोएसडी कार्डद्वारे १ टीबी पर्यंत वाढवता येतो.

Poco M6 Pro 5G: कॅमेरा

पोकोच्या या नवीन फोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात ५० मेगापिक्सलचा AI सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सरचा समावेश आहे. सेल्फी आणि व्हीडोसाठी यात ८मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. फोनला ५००० mAh क्षमतेच्या बॅटरीसह १८ W चार्जिंग सपोर्ट मिळतो. यूएसबी टाइप-सी केबलद्वारे याचे चार्जिंग होते. Poco M6 Pro 5G वर साइड-माउंट केलेले फिंगरप्रिंट स्कॅनर आहे.

हेही वाचा : VIDEO: भारतात लॉन्च झाले पहिले 5G वायरलेस वाय-फाय, ‘या’ शहरांमधील वापरकर्त्यांना होणार फायदा

Moto G14 : कॅमेरा

फोटोग्राफीसाठी यामध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप येतो. ज्यात ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो लेन्सचा समावेश आहे. सेल्फी व व्हिडिओसाठी ८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. Moto G14 मध्ये वापरकर्त्यांना ५००० mAh क्षमतेची बॅटरी मिळते. ज्याला २०W चे फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. हा फोन पाणी आणि धूळ प्रतिरोधासाठी IP52 रेटिंगसह येतो. कनेक्टिव्हिटीसाठी, स्मार्टफोनमध्ये 3.5mm हेडफोन जॅक, USB टाइप-सी पोर्ट, ड्युअल वाय-फाय, GPS, A-GPS आणि 4G LTE आहे.

Poco M6 Pro 5G: किंमत

Poco M6 Pro 5G हा फोन दोन स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. ४/६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १०,९९९ रुपये आहे. तर ६/१२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १२,९९९ रुपये आहे. हा स्मार्टफोन ९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजल्यापासून विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. याची विक्री भारतात केवळ फ्लिपकार्टवर होणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Moto G14 : किंमत

Moto G14 हा फोन ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज या एकाच व्हेरिएंटमध्ये लॉन्च करण्यात आला आहे. याची किंमत ९,९९९ रुपये इतकी आहे. हा फोन स्टील ग्रे आणि स्काय ब्लू या दोन रंगांमध्ये खरेदी करता येणार आहे. मोटो जी १४ याची ८ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. दुपारी १२ वाजल्यापासून फ्लिपकार्ट आणि मोटोरोला इंडियाची अधिकृत वेबसाईट आणि किरकोळ स्टोअर्सवर उपलब्ध होईल. खरेदीदारांना ICICI बँकेच्या कार्डावर ७५० रुपयांचा झटपट डिस्काउंट मिळेल.