दक्षिण कोरियाची कंपनी असणारी Samsung कंपनी अनपॅक्ड २०२३ या इव्हेंटमध्ये Samsung Galaxy S23 सोबतच आपल्या स्मार्टफोनची सिरीज लाँच करणार आहे. दरम्यान सॅमसंग कंपनीने त्यांच्या आगामी लाँच होणाऱ्या Samsung Galaxy Book 3 लॅपटॉपची अधिकृतपणे प्री-बुकिंग सुरु केले आहेत. जे या लॅपटॉपची आधी बुकिंग करतील त्यांना यावर सूट मिळणार आहे. तसेच या साठी सॅमसंग शॉप या अ‍ॅपवर रीडिम करण्यासाठी शॉपिंग व्हाउचर ऑफर केले जाणार आहेत.

सॅमसंग कंपनीने त्यांच्या सॅमसंग गॅलेक्सी बुक 3 सीरिजसाठी त्याचे अधिकृत प्री- बुकिंग वेबपेज लाईव्ह करणार आहे. १ फेब्रुवारी ला सकाळी ११.३० वाजता अनपॅक्ड इव्हेंटनंतर लॅपटॉप विक्रीस उपलब्ध होण्याआधी वापरकर्ते प्री-बुकिंग करू शकणार आहेत. हे बुकिंग करत असताना वापरकर्त्यांना अतिरिक्त लाभ मिळणार आहे. सॅमसंग शॉप अ‍ॅप वर २,००० रुपयांचे व्हाउचर रीडिम करता येणार आहे.

shoe sizing system in india
भारतात येणार नवीन ‘शू सायझिंग सिस्टिम’, ‘भा’ म्हणजे काय आणि त्याची गरज का आहे?
Indian advertising, Diversity,
भारतीय जाहिरातींतील विविधता हरवली! ॲडव्हर्टायझिंग स्टँडर्ड्स कौन्सिल ऑफ इंडियाचा अहवाल काय सांगतो…
Mahindra XUV 3X0 bookings open
महिंद्राच्या नव्या SUV कारला देशातील बाजारपेठेत दाखल होण्यापूर्वीच मोठी मागणी; बुकींग सुरु, पाहा किती मोजावे लागणार पैसे
apple sent alert emails to iphone users
काही भारतीयांच्या ‘आयफोन’मध्ये स्पायवेअर असू शकतं; अ‍ॅपलची धोक्याची सूचना!

हेही वाचा : BSNL ने आणले ‘हे’ जबरदस्त फिचर, आता सेटअप बॉक्सशिवाय पाहता येणार टीव्ही

या सिरीजमध्ये किती लॅपटॉप लाँच केले जातील याचा खुलासा सॅमसंग कंपनीने केलेला नाही आहे. पण यामध्ये व्हॅनिला सॅमसंग गॅलॅक्सी बुक ३, सॅमसंग गॅलॅक्सी बुक ३३६०, सॅमसंग गॅलॅक्सी बुक ३ यांचा समावेश असण्याची शक्यता आहे. याआधी एका अहवालामध्ये सॅमसंग गॅलॅक्सी बुक ३ सिरीजमधील लॅपटॉपचचे फोटोज लीक झाले होते. ज्यात लॅपटॉपची बॉडी ही स्लिम आणि USB Type-C कनेक्टिव्हिटी असलेले डिझाईन होते.