अ‍ॅमेझॉन कंपनी ही एक ई-कॉमर्स कंपनी आहे. यावरून ऑनलाईन खरेदी करता येते. सध्या जागतिक आर्थिक मंदीमुळे खर्च कमी करण्याच्या दृष्टीने अनेक टेक कंपन्यांमध्ये कमर्चाऱ्यांची कपात सुरु आहे. यात अ‍ॅमेझॉनचा देखील समावेश आहे. Amazon Prime वापरणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. Amazon Fresh वरून ग्रोसरी म्हणजेच किराणा मालाचे सामना मागवले जाते. मात्र आता या सामानाची मोफत डिलिव्हरी मिळवण्यासाठी वापरकर्त्यांना जास्त रकमेचे सामान मागवावे लागणार आहे.

Amazon Prime वापरणाऱ्यांना आतापर्यंत ३००० रुपयांपेक्षा जास्त किमतीचे सामान मागवल्यास मोफत डिलिव्हरी मिळत होती. आता मात्र तसे होणार नाही. मोफत डिलिव्हरी साठी तुम्हाला जास्त किंमतीचे म्हणजेच सुमारे १२,२०० रुपयांचे सामान मागवावे लागणार आहे.

हेही वाचा : नाव मोठं, लक्षण खोटं: ‘अ‍ॅमेझॉन’मध्ये टॉयलेटला जायचीही चोरी, कर्मचाऱ्यांनी मांडल्या व्यथा

प्राईम मेंबर्सना कंपनीने ईमेलद्वारे याची माहिती दिली आहे. जे ग्राहक Amazon Fresh वरून त्यांच्या किराणा मालाची ऑर्डर देतात त्यांना मोफत दिलीव्व्हरीसाठी १२,२०० रुपयांची ऑर्डर द्यावी लागेल. यापेक्षा कमी किंमतीची ऑर्डर देणाऱ्या ग्राहकांकडून ३५० ते ८०० रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाईल असे कंपनीने मेलमध्ये म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हे नवीन नियम २८ फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत. अ‍ॅमेझॉनने आपल्या मेलमध्ये असेही म्हटले आहे की, सामान मागवल्यापासून २ तासांमध्ये डिलिव्हरी होईल आणि ग्राहकांना कमी शुल्क भरायचे असेल तर ते ६ तासांनी डिलिव्हरी होण्याचा पर्याय निवडू शकतात.