scorecardresearch

Premium

RBI चा युजर्ससाठी मोठा निर्णय! UPI Lite च्या मदतीने पिन शिवाय करता येणार ‘इतक्या’ रूपयांचा व्यवहार

आपण डिजिटल पेमेंट करण्यासाठी गुगल पे, फोन पे आणि पेटीएमसह अन्य Apps चा वापर करतो.

RBI increase payment limit on UPI lite
युपीआय लाइट सेवा (Image Credit-Financial Express)

आजकाल डिजिटल पद्धतीने पेमेंट करण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच यामुळे जवळ कॅश बाळगण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आपण डिजिटल पेमेंट करण्यासाठी गुगल पे, फोन पे आणि पेटीएमसह अन्य Apps चा वापर करतो. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने UPI लाइट ची व्यवहार मर्यादा २०० रूपयांवरून वाढवून ५०० रूपये इतकी करण्यात आली आहे. युपीआय लाइट जे नॅशनल पेमेंट कार्पोरेशन ऑफ इंडिया आणि आरबीआयने सप्टेंबर २०२२ मध्ये लॉन्च केले होते. ही एक सरळ आणि सोपी डिजिटल पेमेंट पद्धत आहे.

युपीआय लाइटचा उद्देश वापरकर्त्यांना बँकांच्या अधूनमधून येणाऱ्या समस्यांचा सामना न करता अखंडपणे लहान किंमतीचे व्यवहार करण्यास सक्षम करणे हा आहे. नियमित युपीआय व्यवहारांप्रमाणे, ज्यांची दैनिक मर्यादा १ लाख रुपये आहे. युपीआय लाइट व्यवहारांची मर्यादा प्रतिव्यवहार ५०० रुपये आहे. सुरुवातीला ही मर्यादा २०० रूपये होती. याबाबतचे वृत्त Business Today ने दिले आहे.

mindset behind charity
Money Mantra: दानधर्मामागची मानसिकता
SBI SCO Recruitment 2023
एसबीआयच्या करोडो ग्राहकांसाठी नवी सुविधा, आता घरबसल्या बँकिंग सेवा मिळणार
Mumbai Port Trust Bharti 2023
मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये ‘या’ पदांसाठी भरती सुरु; २० हजारांहून अधिक पगार मिळणार, अर्जाची पद्धत जाणून घ्या
yoga-poses-for-better-sleep
झोप येत नाही मग झोपण्यापूर्वी करा हे ३ आसन, येईल शांत झोप

हेही वाचा : ChatGPT च्या OPenAI कंपनीत काम करण्याची संधी, मिळू शकतो तब्बत ३ कोटींपेक्षा अधिक पगार

याशिवाय, आरबीआयने सांगितले, ते युपीआय लाइटच्या माध्यमातून निअर फिल्ड टेक्नॉलॉजीचा वापर करून युपीआयमध्ये ऑफलाइन पेमेंट सुरु करेल. गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी गुरूवारी सांगितले, नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून UPI मध्ये संभाषणात्मक पेमेंट सक्षम करण्याचा प्रस्ताव आहे ज्यामुळे वापरकर्त्यांना पेमेंट करण्यासाठी AI-सक्षम प्रणालींमध्ये गुंतण्यास मदत होईल. नॅशनल पेमेंट्स कार्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) लवकरच संभाषणात्मक पेमेंट लागू करण्यासाठी सूचना जारी करेल अशी अपेक्षा आहे.

”वापरकर्त्यांसाठी डिजिटल पेमेंट अनुभव वाढवण्यासाठी नवीन टेक्नॉलॉजीचा उपयोग करण्याच्या उद्देशाने युपीआयवर ”Conversational पेमेंट” सक्षम करण्याचा प्रस्ताव आहे, जे वापरकर्त्यांना पेमेंट करण्यासाठी AI-सक्षम प्रणालींसह संभाषणात गुंतवून ठेवण्यास सक्षम करेल. युपीआय लाइट व डिव्हाइस वॉलेटच्या माध्यमातून निअर फिल्ड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी वापरून युपीआय वर ऑफलाइन पेमेंट सुरु करणे आणि ऑफलाइन मोडमध्ये लहान डिजिटल पेमेंटसाठी व्यवहार मर्यादा २०० रुपयांवरून ५०० रुपये प्रति व्यवहार करणे जाईल. या उपक्रमांमुळे देशात डिजिटल पेमेंटची पोहोच आणि वापर आणखी वाढेल, असे दास यांनी गुरुवारी सांगितले.

यूपीआय लाईट काय आहे?

यूपीआय लाईट हे ‘वन डिव्हाईस व्हॅलेट’ आहे ज्यामुळे यूपीआय पीनशिवाय छोटे आर्थिक व्यवहार करता येतील. यूपीआय लाईटचा वापर करण्यासाठी तुम्हाला तुमच्या अॅपमधील व्हॅलेटमध्ये काही पैसे टाकावे लागतील. त्यानंतर या व्हॅलेटमधील पेसै तुम्ही यूपीआय लाईटच्या माध्यमातून वापरू शकता. सध्यातरी यूपीआय लाईटची सुविधा भीम अॅपवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. सध्यातरी कॅनरा बँका, एचडीएफसी बँक, इंडियन बँक, कोटक महिंद्रा बँक, पंजाब नॅशनल बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, यूनियन बँक ऑफ इंडिया, उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँक या बँकांचे ग्राहक भीम अॅपच्या माध्यमातून यूपीआय लाईटची सुविधा वापर करू शकतात.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rbi raises per transaction upi lite rs 500 to rs 200 without pin offline payment check all details tmb 01

First published on: 10-08-2023 at 16:24 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×