सध्याच्या काळामध्ये स्मार्टफोन्सवरच सर्व कामे होतात. त्यामुळे बाकीच्या साधनांची एव्हडगी गरज भासत नाही. त्यामुळेच का होईना हल्ली लोकांचा टॅबलेट वापरण्याचा कल कमी झाला आहे. मात्र पुन्हा एकदा आता अनेक कंपन्यांचे टॅबलेट भारतीय बाजारपेठेत लाँच होत आहेत. जे कमी किंमतीमध्ये चांगले फीचर्स देतात. जर तुम्ही चांगल्या आणि स्वस्तातील टॅबलेटच्या शोधात असाल तर आज आपण २० हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीतील टॅबलेट कोणकोणते आहेत ते पाहुयात.

Realme Pad X 

Realme या टॅबलेटची किंमत १९,९९९ रुपये आहे. यात ११ इंचाचा डिस्प्ले येतो. १२८ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅम येते. तसेच ५ जीबी व्हर्च्युअल रॅम सुद्धा यामध्ये येते. या टॅबलेटमध्ये १३ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा वाईड अँगल कॅमेरा येतो. यात चार डॉल्बी ऍटमॉस स्पीकर असून याची बॅटरी ८३४० mAh इतक्या क्षमतेची येते.

Is this waitress serving at a restaurant in China robot or human Find out
भारताला ‘कॅन्सर कॅपिटल ऑफ द वर्ल्ड’ का म्हटले जाते? तज्ज्ञांकडून जाणून घ्या कारण…
Increase in number of cancer patients in India
भारताला कर्करोगाचा विळखा आणखी घट्ट! जाणून घ्या कोणत्या कर्करोगाचा धोका वाढला…
Madhabi Puri Buch, SEBI, Indian market, GST, investment
गुंतवणूकदारांच्या वाढत्या आस्थेमुळे भांडवली बाजाराला उच्च मूल्यांकन – सेबी
Hero Pleasure Plus Xtec Sports launch
Activa, Jupiter समोर तगडं आव्हान; ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह देशात आली हिरोची नवी स्कूटर, ८० हजारांहून कमी किंमत

हेही वाचा : Airtel Recharge Plan: एअरटेलने आणला सर्वात स्वस्त प्लॅन; ३५ रुपयांत मिळणार ‘इतका’ जीबी डेटा

Lenovo Tab M10

Lenovo Tab M10 मध्ये १०. ६१ इचछा फुल डिस्प्ले अणि स्नॅपड्रॅगन एसडीएम ६८०३ हा प्रोसेसर येतो. यात १२८ जीबी स्टोरेज आणि ६ जीबी रॅम आहे. याचे स्टोरेज मायक्रो कार्डच्या मदतीने १ टीबी पर्यंत वाढवता येते. याची बॅटरी ७७०० mAh क्षमतेची बॅटरी येते. सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा आहे व रियर कॅमेरा ८ मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. याची किंमत फ्लिपकार्टवर १९,९९९ रुपये आहे.

Oppo Pad Air

या टॅबलेटमध्ये १०.३६ इंचाचा २के डिस्प्ले येतो. याची रॅम ४ जीबी असून ती ७ जीबी पर्यंत वाढवता येते. यात ८ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि ५ मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा येतो. तसेच ७१००mAh क्षमतेची बॅटरी येते. ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज येते. यांची किंमत ४ जीबी रॅम व ६४ जीबी स्टोरेजसाठी १५,४९९ रुपये तर ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेजसाठी १९,९९९ रुपये इतकी आहे.

हेही वाचा : WhatsApp कॉलसाठी आता कस्टम रिंगटोन सेट करता येणार; समजून घ्या काय आहे प्रोसेस

Samsung Galaxy Tab A8

Galaxy Tab ची किंमत १३,९९९ रुपये इतकी आहे. यात १०.५ इंचाचा डिस्प्ले येतो. चार स्पीकर येतात. रिअर कॅमेरा ८ मेगापिक्सल आणि सेल्फी कॅमेरा ५ मेगापिक्सलचा येतो. ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज मिळते. मायक्रो कार्डच्या मदतीने ते १ टीबी पर्यंत वाढवता येते.