Redmi Note 10T 5G फ्लिपकार्टवरून आज स्वस्तात खरेदी करता येईल. Flipkart Electronics Days सेलचा शेवटचा दिवस २९ मे म्हणजेच रविवार आहे. या सेलमध्ये Redmi चा हा 5G फोन डिस्काउंट आणि ऑफर्ससह घेऊ शकता. फ्लिपकार्ट सेलमध्ये अनेक बँक ऑफर, एक्सचेंज ऑफर आणि EMI वर फोन खरेदी करण्याची संधी आहे. या स्मार्टफोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेट डिस्प्ले आणि ट्रिपल रियर कॅमेरे यांसारखी फिचर्स देण्यात आली आहेत. या फोनची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स बद्दल सर्व काही जाणून घेऊया.

Redmi Note 10T 5G offers
Redmi Note 10T 5G चा 4 GB RAM आणि 64 GB स्टोरेज व्हेरिएंट ११,९९९ मध्ये मिळतोय. तसंच 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज व्हेरिएंट १३,९९९ रुपयांमध्ये घेता येईल. हँडसेट व्हाइट, ग्रेफाइट ब्लॅक, ग्रीन आणि ब्लू कलरमध्ये हा स्मार्टफोन मिळतोय.

Flipkart सेलमध्ये, ICICI बँक क्रेडिट कार्ड नॉन-EMI ट्रांजेक्शनअंतर्गत १००० रूपयांच्या झटपट सवलतीवर Note 10T 5G घेण्याची संधी आहे आणि EMI ट्रांजेक्शनसह १,२५० रूपयांची झटपट सवलत आहे. याशिवाय RBL बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डने फोन घेतल्यावर १० टक्के झटपट सूट मिळेल. फोन खरेदी केल्यावर ेगाना प्लस सबस्क्रिप्शन ६ महिन्यांसाठी विनामूल्य उपलब्ध होतोय. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डने फोन खरेदी केल्यास फ्लॅट ५ टक्के कॅशबॅक मिळेल.

एक्सचेंज ऑफरबद्दल बोलायचे झाले तर, Redmi Note 10T 5G फ्लिपकार्ट वरून ११,२५० रुपयांपर्यंत सूट मिळू शकते. एक्सचेंज व्हॅल्यू तुमच्या जुन्या डिव्हाइसच्या स्थितीवर अवलंबून असेल. तुम्ही ४१६ रुपये प्रति महिना EMI वर हँडसेट देखील घेऊ शकता.

आणखी वाचा : उन्हाळ्यात थंडी वाजेल! तुमच्या कारचा AC असा करा चकाचक, या महत्त्वाच्या टिप्स एकदा वाचाच

Redmi Note 10T 5G Specifications
Redmi Note 10T 5G स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा फुलएचडी + डिस्प्ले आहे. स्क्रीनचा रिफ्रेश दर 90 Hz आहे आणि आस्पेक्ट रेशो 20: 9 आहे. हा फोन Android 11 आधारित MIUI 12 वर चालतो. या रेडमी स्मार्टफोनमध्ये ऑक्टा-कोर मीडियाटेक डायमेन्सिटी 700 प्रोसेसर आहे, 6 जीबी पर्यंत रॅम आहे. हँडसेटमध्ये 48 मेगापिक्सेल प्रायमरी, 2 मेगापिक्सल सेकंडरी आणि 2 मेगापिक्सेल डेप्थ सेन्सरसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. Redmi Note 10T 5G मध्ये अपर्चर F/2.0 सह 8-मेगापिक्सेल सेल्फी सेन्सर आहे.

Redmi Note 10T 5G मध्ये 128 GB पर्यंत इनबिल्ट स्टोरेज देण्यात आले आहे. फोनमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी वाय-फाय, ब्लूटूथ 5.1 आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट उपलब्ध आहेत. हँडसेटमध्ये इन्फ्रारेड ब्लास्टर, 5G सपोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक आहे. Xiaomi ने स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर, 5000mAh बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंग सारखी फिचर्स दिली आहेत.