Redmi Note 11 series : रेडमी आपली नोट ११ सिरीज भारतामध्ये लॉंच करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. आज म्हणजेच ९ फेब्रुवारीला होणाऱ्या रेडमी इव्हेंट दरम्यान ही सिरीज लॉंच केली जाईल. हा इव्हेंट व्हर्च्युअली होस्ट केला जाईल. तसेच, येथे नोट ११एस आणि रेडमी नोट ११ स्मार्टफोन्स सादर केले जातील. एवढेच नाही तर इव्हेंट दरम्यान कंपनी नवीन रेडमी स्मार्ट बँड प्रो आणि रेडमी स्मार्ट टीव्ही एक्स४३ लाँच करेल.

शाओमीने रेडमीचे दोन्ही स्मार्टफोन इतर बाजारात लॉन्च केले आहेत. लॉन्चच्या आधी, रेडमी इंडिया आगामी स्मार्टफोन्सचे वेगवेगळे फीचर्स टीज करत आहेत. नुकत्याच समोर आलेल्या टीझरनुसार, रेडमी नोट ११एस भारतात तीन रंगांच्या पर्यायांसह सादर केला जाईल. तर जाणून घेऊया रेडमी नोट ११एसचे रंग, वैशिष्ट्ये आणि इतर तपशील.

Mumbai, stolen mobile phones,
मुंबई : चोरीचे मोबाइल विकणाऱ्याला अटक
TCS Announces 9 percent Rise, Q4 Net Profit, Rs 12 thousand 434 Crore, Declares Final Dividend, Rs 28 per Share, tata consultancy services, finance article, finance news, share market, stock market,
टीसीएसला १२,४३४ कोटींचा नफा; तिमाहीगणिक ९.१ टक्के वाढ
pune, young engineer girl , overcomes a rare disorder, Treatment of Gartner, Duct Cyst, Marsupialization Procedure, rare disease to girl, rare disease pune, doctor, pune news, marathi news,
अभियंता तरूणीची दुर्मीळ विकारावर मात! मार्सपियलायझेशन प्रक्रियेद्वारे गार्टनर्स डक्ट सिस्टवर उपचार
Change in train schedule due to night block at Vikhroli
विक्रोळीतील रात्रकालीन ब्लॉकमुळे रेल्वेच्या वेळापत्रकात बदल

शाओमीने सांगितल्याप्रमाणे, रेडमी नोट ११एस भारतात स्पेस ब्लॅक, पोलार व्हाइट आणि होराइजन ब्लू या रंगात लॉंच केले जाईल. तथापि, हा स्मार्टफोन जागतिक बाजारात एकाच रंगात उपलब्ध आहे.

तुमचे आधारकार्ड किती वेळा झाले आहे अपडेट? ‘या’ सोप्या पायऱ्यांचा वापर करून जाणून घ्या

या स्मार्टफोनची किंमत २० हजारपेक्षा कमी असण्याची अपेक्षा आहे. तसेच, हा फोन तीन स्टोरेज पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. बेस मॉडेल ६जीबी + ६४ जीबी स्टोरेजचा असेल. तर उर्वरित मॉडेल्समध्ये ६जीबी + १२८जीबी आणि ८जीबी + १२८जीबी स्टोरेज दिले जाऊ शकते.

फोनच्या मागील बाजूस क्वाड-कॅमेरा सेटअप असेल. शाओमीने सांगितल्याप्रमाणे भारतात या फोनमध्ये १०८ मेगापिक्सेलचा प्रायमरी सेन्सर असेल. फोनमध्ये डेप्थ आणि मॅक्रोसाठी ८ मेगापिक्सेल अल्ट्रावाइड कॅमेरा आणि २ मेगापिक्सेलचे दोन सेन्सर्स सुद्धा असतील. फ्रंट कॅमेरासाठी स्क्रीनच्या वरच्या मध्यभागी एक होल-पंच कटआऊट आहे. रेडमी नोट ११एसमध्ये १६ मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर आहे.

हा स्मार्टफोन ६.४३ इंचाच्या एमोएलईडी डिस्प्ले आणि ९०Hz रिफ्रेश रेटसह येईल. फोनमध्ये मीडियाटेक हेलिओ जी९६ एसओसी पॉवर असेल. तसेच फोनमध्ये ३३W फास्ट चार्जिंगसह ५०००एमएएच बॅटरी दिली जाईल. फोनमध्ये स्टिरिओ स्पीकर, साइड-माउंट फिंगरप्रिंट स्कॅनर आणि आयआर ब्लास्टर आहे. या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉइड ११ वर आधारित एमआययूआय १३ ऑपरेटिंग सिस्टम असेल.