Jio Launches Rs 61 Data Pack: तुम्हाला आठवत असेल की रिलायन्स जिओच्या माध्यमातून देशभरात वापरकर्त्यांना मोफत इंटरनेटची भेट देण्यात आली होती. या स्मार्ट खेळीनंतर जिओने ग्राहकांना वेगवान नेटवर्कची सवय लावली आणि मग यातून नफा मिळवण्याचे वेगवेगळे पर्याय शोधून काढले. जिओ हीच खेळी आता 5G इंटरनेट स्पीडसाठी सुद्धा लागू करण्याच्या तयारीत आहे. नुकतंच रिलायन्स जिओकडून अवघ्या ६१ रुपयांचा 5G डेटा पॅक लाँच करण्यात आला आहे. मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स जिओचा हा प्लॅन प्रीपेड ग्राहकांसाठी उपलब्ध असणार आहे. अवघ्या ६१ रुपयांच्या या पॅकमध्ये आपल्याला नेमके काय फायदे मिळणार हे जाणून घेऊयात..

६१ रुपयांचा जिओ 5G डेटा पॅकचे फायदे (Jio 61 Rs Data Pack)

रिलायन्स जिओच्या ६१ रुपयांच्या प्लॅनची वैधता तुमच्या सध्या वापरात असणाऱ्या पॅक इतकी असणार आहे. हा टॉप अप रिचार्ज आपण वापर करत असलेल्या पॅक अंतर्गत वापरू शकता. म्हणजेच समजा आपल्याकडे सध्या महिन्याभरासाठीचा पॅक आहे पण आपल्याला काही कामासाठी किंवा सुट्टीच्या दिवशी अतिरिक्त डेटाची गरज आहे तर अशावेळी आपण हा बोनस पॅक रिचार्ज करू शकता.

china people punished for not paying debt
जीवनावश्यक वस्तू खरेदी करणेही कठीण; कर्ज फेडू न शकणाऱ्यांना चीन कशी शिक्षा करत आहे?
Post Office FD Rate and Calculations in Marathi
पोस्टाच्या पाच वर्षांच्या FD मध्ये किती परतावा मिळतो? पोस्ट ऑफिसची मुदत ठेव योजना व नफ्याची आकडेवारी पाहा
ED Seizes Assets more than Rs 24 Crore from VIPS Group Owner Vinod Khute
व्हीआयपीस् ग्रुपच्या विनोद खुटे याच्याशी संबंधित मालमत्तेवर ईडीची टाच, ५८ बँक खात्यातील रक्कम व ठेवींचा समावेश
Apple CERT-In Security Alert Marathi News
लाखो iOS – Android युजर्सचा डेटा चोरी होण्याचा धोका! फोनमध्ये ‘हे’ बदल करून घ्यायचा CERT-In चा इशारा

रिलायन्स जिओच्या या पॅकमध्ये आपल्याला 5G डेटा स्पीडने ६ जीबी डेटा मिळणार आहे. ही मर्यादा संपताच नेटवर्क स्पीड कमी करून ६४ Kbps वर काम करेल. हा रिचार्ज पॅक वापरण्यासाठी आपल्याला ११९, १४९, १७९, १९९ किंवा २०१९ रुपयांचा एक पूर्व रिचार्ज करावा लागेल.

हे ही वाचा<< बॉलिवुड, हॉलिवुड, टॉलिवुड मधील ‘वुड’चा अर्थ काय? भारतात विविध भाषांमधील चित्रपटांना काय म्हणतात?

दरम्यान, रिलायन्स जिओने अलीकडेच देशातील १० प्रमुख शहरांमध्ये 5G नेटवर्क सुरु केले आहे. यात आग्रा, कानपुर, प्रयागराज, मेरठ, तिरूपति, नेल्लोर, कोझाइकोड, त्रिशूर, नागपुर व अहमदनगर यांचाही समावेश आहे. देशभरात सध्या ८५ शहरांमध्ये 5G नेटवर्क उपलब्ध आहे. जिओच्या नवीन योजनेसह २०२३ या वर्षात पूर्ण देशात 5G नेटवर्क उपलब्ध होणार आहे.