गेल्या अनेक दिवसांपासून रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडच्या ४६ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेची ग्राहक वाट पाहत होते आणि काल म्हणजेच २८ ऑगस्ट २०२३ रोजी वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. रिलायन्स जिओ सध्या देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नेहमीच नवनवीन प्लॅन्स लॉन्च करत असते. रिलायन्स जिओने आपल्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या (AGM) आधी ३ नवीन बजेट फ्रेंडली प्रीपेड आंतरराष्ट्रीय रोमिंग जाहीर केले आहेत. या प्लॅन्सबद्दल अधिक जाणून घेऊयात.

कंपनीने आपले प्लॅन अपडेट केले असून, अपडेट करण्यात आलेले आंतरराष्ट्रीय प्लॅन्स हे मागील प्लॅनच्या तुलनेत अधिक डेटा आणि कॉलिंग मिनिटे प्रदान करतात. हे प्लॅन्स ४४ देशांमध्ये लागू आहेत. जिओच्या नवीन प्लॅन्सबद्दल तुम्हाला माहित असणे आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट येथे आहे. याबाबतचे वृत्त Indian Express ने दिले आहे.

Sensex, Nifty, Nifty pulls back,
‘सेन्सेक्स’ला ७०० अंशांची झळ; ‘निफ्टी’ विक्रमी पातळीपासून माघारी
singapore hong kong marathi news, mdh spices ban in singapore hong kong marathi news
सिंगापूर, हाँगकाँगमध्ये काही भारतीय मसाल्यांवर बंदी का? अमेरिकेचा आक्षेप काय? घातक कीटकनाशकांचे प्रमाण आढळले?
bse sensex rise 599 points to settle at 73088
तेजीवाल्यांची पुन्हा सरशी; तणाव निवळल्याने सेन्सेक्सची सहा शतकी दौड
stock market update sensex drops 454 points nifty settle at 21995 print
मंदीवाल्यांचा जोर कायम; ‘सेन्सेक्स’मध्ये ४५४ अंश घसरण

हेही वाचा : लॉन्चिंगपूर्वीच iPhone 15 Ultra चे स्पेसिफिकेशन्स झाले लीक, किंमत…, एकदा पाहाच

कंपनीच्या लिस्टमध्ये सर्वात स्वस्त प्लॅन हा १,४९९ रुपयांचा आहे. ज्यात वापरकर्त्यांना १५० कॉलिंग मिनिटे आणि १०० एसएमएससह येतो. याची वैधता १४ दिवस इतकी आहे. त्यात १ जीबी डेटा ऑफर केला जातो. तथापि जिओ तुमच्याकडून सर्व इनकमिंग कॉल्ससाठी शुल्क आकारले. जर का तुम्ही मोफत इनकमिंग ऑफर करणारा प्लॅन शोधात असाल तर ३,९९९ रुपयांचा प्लॅन तुम्ही घेऊ शकता. ज्यात २५० मिनिटे कॉलिंग मिनिटे आणि १०० एसएमएस सारखे फायदे मिळतात. यात ४ जीबी डेटा आणि ३० दिवसांची वैधता मिळते.

लिस्टमध्ये शेवटी ४०० मिनिटांच्या मोफत इनकमिंगसह येणारा प्लॅन हा ५,९९९ रुपयांसह येतो. त्यात ५००० एसएमएस आणि ६ जीबी मोबाइल डेटा देखील मिळतो. याची वैधता ३० दिवसांची आहे.

सर्व आतंरराष्ट्रीय रोमिंग प्लॅनसह येणारे टेक्स्ट मेसेज विनामूल्य आहेत. तुमचा डेटाचे फायदे समाप्त झाल्यानंतर स्पीड एकत्र ६४ Kbps पर्यंत कमी होईल किंवा मानक PayGo दरांनुसार शुल्क आकारले जाईल असे जिओचे म्हणणे आहे. इथे लक्षात घेण्यासारखी एक गोष्ट आहे ती म्हणजे जिओवर आऊटगोइंग आणि इनकमिंग व्हॉइस कॉलची किंमत वेगवेगळ्या देशांवर अवलंबून असते. तसेच आंतरराष्ट्रीय रोमिंग शुल्क तुमचे स्थान आणि वापरलेल्या नेटवर्क यावर लागू होईल.