रिलायन्स जिओने आपल्या वापरकर्त्यांसाठी ६ नवीन प्रीपेड रिचार्ज प्लॅन लॉन्च केले आहेत. यामध्ये वापरकर्त्यांना डिस्नी + हॉटस्टार सबस्क्रिप्शन मिळणार आहे. रिलायन्स जिओ ही देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी आहे. देशामध्ये सर्वात पहिले ५ जी नेटवर्क जिओने सुरू केले आहे. २०२३ च्या अखेरपर्यंत देशातील प्रत्येक भागात ५ जी सेवा सुरू करण्याचे जिओचे उद्दिष्ट आहे. जिओने लॉन्च केलेल्या ६ प्लॅन्समध्ये डिस्नी+ हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन मिळणार आहे. त्यामुळे वर्ल्ड कप पाहण्यासाठी ग्राहकांना मदत होणार आहे. या प्लॅन्सबद्दल जाणून घेऊयात.
जिओने लॉन्च केलेल्या ६ प्लॅनमध्ये क्रिकेट चाहत्यांना HD (७२०P) रिझोल्युशनमध्ये वर्ल्ड कप स्पर्धेचे सामने बघता येणार आहेत. तसेच या प्लॅन्समध्ये ३ व एका वर्षासाठी डिस्नी + हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन मिळणार आहे. जिओने लॉन्च केलेल्या ६ प्लॅन्सपैकी बेस प्लॅनची किंमत ३२८ रुपये आहे. यामध्ये वापरकर्त्यांना २८ दिवसांची वैधता मिळते. तसेच दररोज १.५ जीबी ४ जी डेटा मिळतो. या प्लॅनमध्ये तीन महिन्यांसाठीचे डिस्नी+ हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन मिळते. याप्रमाणेच ३८८ रुपयांच्या प्लॅनमध्ये तीन महिन्यांच्या डिस्नी+ हॉटस्टारच्या सबस्क्रिप्शनसह दररोज २ जीबी ४ जी डेटा वापरायला मिळतो. याबबातचे वृत्त The Indian Express ने दिले आहे.
हेही वाचा : ICC World Cup स्पर्धेसाठी एअरटेलने लॉन्च केले ‘हे’ दोन प्लॅन्स, फायदे एकदा बघाच
जर का तुम्हाला पूर्ण वर्षासाठी डिस्नी+ हॉटस्टारचे सबस्क्रिप्शन हवे असेल तर तुम्ही जिओच्या ५९८ रुपयांच्या प्लॅनचा विचार करू शकता. ज्यामध्ये २८ दिवसांची वैधता ग्राहकांना मिळते. याप्रमाणेच जिओकडे एक वर्षभराचा प्रीपेड प्लॅन आहे ज्याची किंमत ३,१७८ रुपये आहे. त्यामध्ये दररोज २ जीबी इतका डेटा वापरण्यासाठी मिळतो.
जिओच्या ६ प्लॅन्सपैकी दोन प्लॅन्सची किंमत ही ७५८ रुपये आणि ८०८ रुपये आहे. ज्यामध्ये तुम्हाला तीन महिने किंवा ८४ दिवसांची वैधता मिळते. ज्यामध्ये १.५ जीबी किंवा २ जीबी डेटा दररोज मिळतो. जर का तुमच्याकडे जिओचे ५ जी नेटवर्क असेल तर तुम्ही सर्व डेटा प्लॅन्समध्ये अनलिमिटेड ५ जी डेटाचा अॅक्सेस मिळतो. याशिवाय जर का तुम्हाला ३० दिवसांसाठी ४० जीबी डेटा हवा असल्यास तुम्ही ३३१ रुपयांचा रिचार्ज देखील करू शकता.