Samsung ने १ फेब्रुवारी रोजी unpacked event मध्ये आपली S23 सिरीज लॉन्च केली. या सिरीजमध्ये तीन स्मार्टफोन्स लॉन्च करण्यात आले होते. त्यामध्ये Galaxy S23, Galaxy S23+ आणि Galaxy S23 Ultra हे तीन स्मार्टफोन्स लॉन्च करण्यात आले होते. Galaxy S23 Ultra हा फोन या सिरीजमधील सर्वात लोकप्रिय झालेला स्मार्टफोन आहे. दरम्यान सॅमसंगने आपल्या S23 सिरीजमधील अल्ट्रा मॉडेलचे नवीन व्हर्जन लॉन्च केले आहे. Samsung Galaxy S23 Ultra BMW M Edition असे त्या मॉडेलचे नाव आहे. या नवीन मॉडेलमध्ये काय असणार खास फीचर्स आणि त्याची किंमत व ते कोणाला खरेदी करता येणार हे जाणून घेऊयात.

बीएमडब्ल्यू एम एडिशमध्ये काय आहे खास ?

या स्मार्टफोनचे पॅकेजिंग हे रेग्युलर S23 Ultra पेक्षा पूर्णपणे वेगळे आहे. यामध्ये तुम्हाला यामध्ये एक BMW ची रिंग , BMW चा लोगो आणि BMW राउंडल मिळणार जे कंपनीने ५० व्य वर्धापन दिनानिमित्त लॉन्च केले आहे. याशिवाय तुम्हाला या फोनमध्ये एअर कंप्रेसर, ‘वी आर मी’ मेटल लोगो एक कप होल्डर/वायरलेस चार्जर, एक घड्याळ, एक फोटो बुक आणि एक पोस्टर देखील मिळणार आहे. यासोबतच कंपनी क्काही भाग्यवान ग्राहकांना दक्षिण कोरियातील BMW ड्रायव्हिंग सेंटरचे स्टार्टर पॅक व्हाउचर देखील देणार आहे. बीएमडब्ल्यू एम एडिशनमध्ये तुम्हला तीन वेगवेगळ्या प्रकारचे बूट अ‍ॅनिमेशन दिसणार आहे. म्हणजे स्मार्टफोन सुरु केला की या एडिशनमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अ‍ॅनिमेशन वापरकर्त्यांना पाहायला मिळणार आहे.

हेही वाचा : अतिशय कमी बजेटमध्ये मिळतोय Lava Blaze 5G स्मार्टफोन; रॅम, मेमरी, फिचर्स जाणून घ्या

किंमत व कोण खरेदी करू शकणार

या BMW M Edition साठी सॅमसंगने BMW आणि SK Telecom सोबत पार्टनरशिप केली आहे. मात्र ही नवीन सिरीज फक्त दक्षिण क्रियांमध्ये विकली जाणार आहे. कंपनी या नवीन सीरिजच्या मॉडेलची फक्त १,००० युनिट्सचे उपादान करणार आहे. त्यामुळे १,००० लोकच हा स्मार्टफोन खरेदी करू शकणार आहेत.Samsung Galaxy S23 Ultra BMW M Edition हे मॉडेल Phantom ब्लॅकरंगांमध्ये उपलब्ध असणार आहे आणि याची किंमत १,१२,९६० रुपये असणार आहे जी भारतातील रेग्युलर मॉडेलपेक्षा कमी आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Galaxy S23 Ultra चे फीचर्स

Galaxy S23 Ultra हा स्मार्टफोन या सिरीजमधील सर्वात प्रीमियम आणि महागडा स्मार्टफोन आहे. यामध्ये Snapdragon 8 Gen 2 चे अपग्रेड व्हर्जन देण्यात आले आहे. वापरकर्त्यांना ६.८ इंचाचा QHD +AMOLED डिस्प्ले मिळणार आहे.या फोनचे वजन हे २३४ ग्रॅम आहे. यामध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप येतो. तसेच याचा कॅमेरा या २०० मेगापिक्सलचा आहे. हे या फोनचे सर्वात महत्वाचे फिचर आहे. यात 3x आणि 10x ऑप्टिकल झूम सह १२ मेगापिक्सल अल्ट्रावाइड आणि दोन १० मेगापिक्सलच्या टेलीफोटो लेन्स आहेत. १२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा यामध्ये मिळणार आहे. या फोनमधून दिवसा आणि रतरी काढण्यात आलेल्या फोटोंची क्वालिटी ही चांगलीच असणार आहे. कमी प्रकाशामध्ये फोटो काढण्याची समस्या यामुळे दूर होणार आहे.