Samsung working on foldable laptop : अलीकडे फोल्डेबल तंत्रज्ञानाची जोरदार चर्चा सुरू आहे. नुकतेच ओप्पोने आपला फोल्डेबल फोन oppo find n2 लाँच केला आहे. हा फोन सॅमसंगच्या फ्लिप फोनला टक्कर देणार. तर आयफोनदेखील पुढील वर्षी फोल्डेबल उपकरण लाँच करण्याची शक्यता आहे. असूसने आधीच फोल्डेबल लॅपटॉप लाँच करून अनेकांना आव्हान दिले आहे. तर आता सॅमसंग देखील फोल्डेबल लॅपटॉपवर काम करत असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. म्हणून भविष्यात फोल्डेबल तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नावीन्यपूर्ण उपकरणे आणि कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा घडण्याची शक्यता आहे.

इलेकच्या अहवालानुसार, सॅमसंग आपल्या पहिल्या फोल्डिंग डिस्प्ले असलेल्या लॅपटॉप निर्मितीवर काम करत आहे. या लॅपटॉपमध्ये मोठी १७.३ इंच स्क्रीन असेल. या उपकरणामध्ये फोल्डिंग ओएलईडी असेल. अहवालानुसार, सॅमसंगचा फोल्डेबल स्क्रीन असलेला पहिला लॅपटॉप २०२२ मध्ये रिलीज होणार होता. मात्र, अज्ञात कारणामुळे ते पुढे ढकलण्यात आले. २०२३ वर्षाच्या सुरुवातील हा फोल्डिंग लॅपटॉप लाँच होण्याची शक्यता आहे जो असूसच्या झेनबूक १७ फोल्डला टक्कर देईल.

Looking For mid range Good smartphone with Best Long stellar battery life Check Out These Five Options
फक्त एकदाच चार्ज करा; बेस्ट बॅटरी लाईफ असणारे ‘हे’ पाच स्मार्टफोन्स स्वस्तात खरेदी करा; संपूर्ण यादी पाहाच
Elon Musk Is Testing Adult Content Group feature users to create communities around adult sensitive content
‘एक्स’ आता नव्या युजरला पैसे आकारणार, एलॉन मस्क यांचा निर्णय
Disney pushing users towards paying for their own account and Stop password sharing From June
नेटफ्लिक्स नंतर Disney चा मोठा निर्णय, ‘ही’ सुविधा करणार बंद; कधी होणार अंमलबजावणी?
How To Use Quick Share feature on Android to quickly send files without an active internet connection
दोन फोनमध्ये करा Quick Share; ॲप अन् इंटरनेटचीही गरज नाही, फॉलो करा ‘या’ स्टेप्स

(Whatsapp युजर्स सावधान! ‘Hi Mum’ मेसेज आलाय? मग वेळीच टाळा, अन्यथा होईल मोठे नुकसान)

बाजारात फोल्डिंग लॅपटॉपला मोठी मागणी नसली तर ते निश्चितपणे एक विशिष्ट उत्पादन आहे. इतर फोल्डिंग लॅपटॉप प्रमाणे सॅमसंगच्या फोल्डेबल लॅपटॉपची किंमत देखील महाग असण्यची शक्यता आहे. लॅपटॉपची किंमत २ लाखांच्या जवळपास असू शकते जी समान वैशिष्ट्यांसह नियमित लॅपटॉपच्या किंमतीच्या तुलनेत ८२ हजार ७६० रुपये अधिक आहे.

सॅमसंगच्या फोल्डिंग लॅपटॉपच्या स्पेसिफिकेशनबाबत पूर्ण माहिती उपलब्ध नाही. मात्र, त्यात कमीत कमी १६ जीबी रॅम आणि ५१२ जीबी इंटरनल स्टोअरेजसह १२ जेन इंटेल प्रोसेसर मिळू शकते. त्याचबरोबर, लॅपटॉपमध्ये विंडोज ११ ओएस, टच इनपूट आणि एस पेन मिळू शकते.