स्मार्टफोन प्रेमींसाठी आता एक आनंदाची बातमी आहे. कारण या आठवड्यात लवकरच काही धमाकेदार फीचर्ससह अनेक स्मार्टफोन लॉन्च करण्यात येणार आहे. यामध्ये इनफिनिक्स, आसुस, वनप्लस, आणि रिअलमी या कंपन्या भारतीय बाजारात त्यांचे नवीन स्मार्टफोन आणत आहेत. चला तर मग जाणून घेऊयात कोणते स्मार्टफोन लॉन्च होणार आहे.
OnePlus मोबाईल फोन निर्माता कंपनी १७ फेब्रुवारीला त्यांचा OnePlus Nord CE 2 5G स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. त्या सोबतच इनफिनिक्स देखील त्यांचा पहिला 5G मोबाईल फोन लॉन्च करण्याची घोषणा केली आहे. तर आसुस आणि रिअलमी हे देखील त्यांच्या नवीन फोनसह बाजारात दाखल होत आहेत.
Infinix Zero 5G स्मार्टफोन
व्हॅलेंटाइन डेच्या निमित्ताने प्रसिद्ध स्मार्टफोन निर्माता Infinix त्यांचा पहिला ५G स्मार्टफोन लॉन्च करणार आहे. Infinix भारतात Infinix Zero 5G हा स्मार्टफोन लॉन्च करत असून याची किंमत अंदाजे २०,००० रुपये इतकी आहे.
Infinix Zero 5G मध्ये MediaTek Dimensity ९०० प्रोसेसर, १३Band ५G सपोर्ट यासारख्या फीचर्ससह येईल. हा फोन ८ जिबी रॅम आणि १२८ जिबी स्टोरेजसह येणार आहे. Infinix Zero 5G मोबाईल फोनमध्ये १२०Hz रिफ्रेश रेटसह ६.७-इंचाचा AMOLED डिस्प्ले असणार आहे. फोनमधील कनेक्टिव्हिटीसाठी, NFC, USB Type-C आणि ३.५mm हेडफोन जॅक समाविष्ट असू शकतो. नवीन स्मार्टफोनमध्ये ३३W फास्ट चार्जिंग सपोर्टसाठी ५०००mAh बॅटरी असण्याची अपेक्षा आहे.
Asus ROG Phone 5s स्मार्टफोन
Asus १५ फेब्रुवारी रोजी Asus ROG Phone 5s आणि Asus ROG Phone 5s Pro स्मार्टफोन भारतात लॉन्च करणार आहे. हा स्मार्टफोन गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये Qualcomm Snapdragon ८८८+ चिपसेट सह सादर करण्यात आला होता.
Asus ROG Phone 5S च्या जागतिक प्रकारानुसार, भारतातील आगामी ROG Phone 5s आणि ROG Phone 5s Pro Android ११ वर ROG UI स्किनसह ऑफर केले जातील. या नवीन Asus स्मार्टफोन्समध्ये ६.७८ -इंचाचा Samsung AMOLED E4 डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले १४४Hz रिफ्रेश रेटसह येतो.
रिअलमी ९ प्रो सिरिज
स्मार्टफोन निर्माता रियलमी त्यांचा रिअलमी ९ प्रो सीरीजचे फोन १६ फेब्रुवारी रोजी लॉन्च करणार आहे. या सिरिजमध्ये रिअलमी ९ प्रो हा स्मार्टफोन भारतात तसेच जागतिक बाजारपेठेत सादर केले जातील. ९ प्रो सीरीज स्मार्टफोनची किंमत अंदाजे २०,९९९ रुपये तसेच २१,९९९ रुपये इतकी असू शकते.
रिअलमी ९ प्रो या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेन्सरसह गुडिक्स डिस्प्ले दिला जाईल. OIS सह या स्मार्टफोनमध्ये Sony IMX766 सेंसर देण्यात आला आहे. रिअलमी ९ प्रो मध्ये तुम्हाला ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सह ५०-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. यात ८-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि २MP डेप्थ सेन्सर आहे. नवीन सेन्सर असलेल्या या फोनच्या मदतीने कमी प्रकाशातही चांगली फोटोग्राफी करता येईल, असा दावा कंपनीने केला आहे.
OnePlus Nord CE 2 5G स्मार्टफोन
हँडसेट निर्माता वनप्लस १७ फेब्रुवारीला भारतात एक नवीन स्मार्टफोन oneplus Nord CE 2 5G लॉन्च करणार आहे. वनप्लस या कंपनीने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून फोन लॉन्च करण्याबद्दलची माहिती दिली आहे.
वनप्लसच्या नवीन स्मार्टफोनचे साइड बटण आणि साइड पॅनल देण्यात आले आहे. फोनच्या डाव्या बाजूला व्हॉल्यूम बटणे आहेत, तर उजवीकडे पॉवर बटण दिलेले आहे. नवीन वनप्लस या फोनला ८ जिबी रॅम आणि १२८ जिबीपर्यंत स्टोरेज देण्यात आला आहे. या फोनमध्ये ColorOS १२वर आधारित अँड्रॉइड १२ ऑपरेटिंग सिस्टम देखील मिळणार आहे.