scorecardresearch

Premium

टाटा कंपनी उभारणार दुसरा आयफोन कारखाना! ‘एवढ्या’ कामगारांना मिळणार रोजगाराच्या संधी…

टाटा समूह भारतात दुसरा आयफोनचा कारखाना उभारणार आहे…

Tata company will set up another iPhone factory To Hasten Apples India Expansion
(सौजन्य: लोकसत्ता.कॉम) टाटा कंपनी उभारणार दुसरा आयफोन कारखाना! 'एवढ्या' कामगारांना मिळणार रोजगाराच्या संधी…

ॲपल कंपनीच्या प्रत्येक वस्तू अनेक ग्राहकांना नेहमीच आकर्षित करतात. मग ते आयफोन, ॲपल वॉच, आयपॅड किंवा आणखीन कोणत्या वस्तू असो. भारतात ॲपल प्रोडक्टची वाढती मागणी पाहता कंपनीने मुंबई आणि दिल्लीमध्ये आपले अलिशान स्टोर्ससुद्धा सुरू केले; तर आयफोन हा भारतातील पहिला देशांतर्गत आयफोन उत्पादक बनला आहे.

आता देशात ॲपलचे उत्पादन वाढवण्यासाठी टाटा समूहाने भारतातील सर्वात मोठ्या आयफोन असेंब्ली प्लांटपैकी एक तयार करण्याची योजना आखली आहे. टाटा समूह भारतात दुसरा आयफोनचा कारखाना उभारणार आहे. तसेच यासाठी आयफोन उत्पादन युनिट सुरू करण्याच्या तयारीत आहे. हा कारखाना तामिळनाडूमधील होसूर ठिकाणाजवळ असेल. आयफोन प्लांट सुरू करण्यासाठी ॲपलने होसूरमध्ये प्लांट असलेल्या टाटा इलेक्ट्रॉनिक्सला कंत्राट दिले आहे. टाटा कंपनी फॉक्सकॉन, विस्ट्रॉन आणि पेगाट्रॉन या आघाडीच्या इलेक्ट्रॉनिक्स कंपन्यांकडून भारतात आयफोन तयार करते. टाटा यांनी यापूर्वीच कर्नाटकातील बेंगळुरूजवळील विस्ट्रॉनचा असेंब्ली प्लांट विकत घेतला आहे, तर टाटा आता तामिळनाडूतील होसूरमध्ये दुसरा कारखाना उभारण्याचा विचार करत आहेत.

DJ used for entertainment
आवाज वाढव डीजे तुला..
Tata electric car
कार खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! टाटाच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या ‘या’ २ इलेक्ट्रिक गाड्या झाल्यात स्वस्त
pune woman business marathi news, mccia marathi news
महिला उद्योजकांना पाठबळ! एमसीसीआयएचे खास महिलांसाठी ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’
483 crore for the facilities of the expanded Taloja Industrial Estate
विस्तारित तळोजा औद्योगिक वसाहतीच्या सुविधांसाठी ४८३ कोटी

हेही वाचा…गुगलचे सर्वात मोठे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मॉडेल लॉन्च! ओपन एआयच्या चॅट जीपीटीला टक्कर

फॉक्सकॉनचा कर्नाटक प्लांट एप्रिलमध्ये सुरू होईल. येथे वर्षाला दोन कोटी आयफोनची निर्मिती केली जाईल, त्यामुळे फॉक्सकॉनचा तामिळनाडू प्लँटही क्षमता वाढवेल. टाटांचा नवीन होसुर प्लँटदेखील कर्नाटक प्लांट उत्पादनात योगदान देईल आणि सर्व प्लांट मिळून पाच-सहा कोटी आयफोन तयार करतील. कंपनी दोन-तीन वर्षात हे उद्दिष्ट साध्य होईल, अशा योजनेवर काम करत आहे.

दक्षिणेकडील तामिळनाडू राज्यातील होसूर येथे टाटा कंपनी ॲपलचा कारखाना बांधणार आहे. या सुविधेमध्ये सुमारे २० असेंब्ली लाईन्स असतील आणि ५० हजार कामगारांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत. तसेच १२ ते १८ महिन्यांत साइट कार्यान्वित करण्याचे टाटा कंपनीचे उद्दिष्ट आहे. ही योजना ॲपलची टाटाबरोबरची पार्टनरशिप आणखीन घट्ट करेल.

भारतीय समूहाने ॲपलबरोबरचा व्यवसाय वाढवण्यासाठी मिठापासून सॉफ्टवेअरपर्यंतच्या पारंपरिक व्यवसायांच्या पलीकडे विस्तार करण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. टाटा कंपनीने असेही म्हटले आहे की, ते ॲपल उत्पादनांवर लक्ष केंद्रित करणारी १०० रिटेल स्टोअर्स सुरू करणार आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Tata company will set up another iphone factory to hasten apples india expansion asp

First published on: 10-12-2023 at 15:32 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×