scorecardresearch

आयफोन प्रेमींसाठी आनंदाची बातमी: ‘या’ माॅडेलवर मिळतोय २१,००० रुपयांपर्यंतचा डिस्काउंट; सोबत आणखी बरंच काही, पाहा ऑफर

स्वस्त किंमतीत आयफोन मिळण्याची वाट पाहणाऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे.

आयफोन प्रेमींसाठी आनंदाची बातमी: ‘या’ माॅडेलवर मिळतोय २१,००० रुपयांपर्यंतचा डिस्काउंट; सोबत आणखी बरंच काही, पाहा ऑफर
iPhone 13 वर डिस्काउंट. (Photo-financialexpress)

iPhone 13: Apple प्रेमी भारतीय ग्राहकांसाठी खुशखबर आहे. तुम्ही iPhone 13 खरेदी करण्याच्या विचारात असाल तर ही संधी तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. iPhone 13 आता तुम्हाला स्वस्तात खरेदी करता येणार आहे. iPhone 13 या मॉडेलची किंमत ६९,९०० रुपये इतकी आहे. यावर आता २१ हजार रुपयांपेक्षा जास्त सूट मिळत आहे. ऑफर्समुळे iPhone 13 कमी किमतीत मिळत आहे. विशेष म्हणजे, यात अनेक ऑफर आणि सवलतींचा समावेश आहे, ज्यांच्या मदतीने तुम्ही स्वस्तात आयफोन १३ चे मालक बनू शकता.

iPhone 13 वर डिस्काउंट

ई-कॉमर्स साइट वर जबरदस्त ऑफर मिळत आहे. फ्लिपकार्टवर iPhone 13 खूप कमी किंमतीत मिळत ​​आहे. तसेच त्यावर वेगवेगळ्या ऑफर्स मिळत आहे. त्याची मूळ किंमत ६९,९०० रुपये इतकी आहे परंतु, त्याच्या किमतीवर ५ टक्के डिस्काउंट उपलब्ध असल्यामुळे तो ६५,९९९ रुपयांना विकला जात आहे.

(आणखी वाचा : FIFA World Cup 2022: Vodafone Ideaने लाँच केले चार जबरदस्त प्लॅन; कॉल-डेटा-SMS सह मिळणार ‘हे’ फायदे )

iPhone 13 एक्सचेंज ऑफर
त्याशिवाय तुम्हाला आता एक्सचेंज ऑफरसह iPhone 13 खरेदी करता येईल. iPhone 13 फ्लिपकार्टवर १७,५०० रुपयांपर्यंतच्या सवलतीसह उपलब्ध आहे. जर तुम्हाला या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर नवीनतम मॉडेल सूचीमध्ये आलेल्या चांगल्या स्थितीतील फोनची देवाणघेवाण करावी लागेल.

iPhone 13 बँक ऑफर्स

या स्मार्टफोन्सवर तुम्हाला अनेक बँक ऑफर्सही मिळत आहेत. तुम्ही Flipkart Axis Bank कार्ड वापरल्यास, तुम्हाला ५% कॅशबॅक मिळेल. याशिवाय, तुम्ही हा फोन २२५६ रुपयांच्या सुरुवातीच्या EMI वर देखील खरेदी करू शकता.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-12-2022 at 15:45 IST

संबंधित बातम्या