scorecardresearch

Premium

नवीन अपडेटमध्ये बदलणार WhatsApp स्टेटसचा लूक! जाणून घ्या काय असेल खास….

युजरचे स्टेटस पाहण्यासाठी आता तुम्हाला त्यांच्या प्रोफाईलवर टॅप करण्याची गरज भासणार नाही

The look of status will change whatsapp might soon start showing status in chat window
(सौजन्य: Pexels/ लोकसत्ता.कॉम) नवीन अपडेटमध्ये बदलणार WhatsApp स्टेटसचा लूक! जाणून घ्या काय असेल खास….

व्हॉट्सअ‍ॅप हे एक असे अ‍ॅप आहे; जे तुम्हाला प्रत्येकाच्या फोनमध्ये पाहायला मिळेल. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून अनेक कामे सोपी झाली आहेत. मित्र-मैत्रिणींबरोबर सहलींचे प्लॅन, दूरच्या नातेवाइकांशी व्हिडीओ कॉल, तसेच अनेक महत्त्वाची कामे व्हॉट्सअ‍ॅपद्वारे अगदी सहज केली जातात. तसेच कंपनी युजर्ससाठी नवनवीन फीचर्ससुद्धा घेऊन येत असते; ज्यामुळे या अ‍ॅपची उपयुक्तता वाढेल आणि वापरकर्त्यांना चांगला अनुभव मिळत राहील. आता पुन्हा व्हॉट्सअ‍ॅप एक खास फीचर घेऊन येणार आहे.

प्रोफाइलखाली मजकुरात लिहिलेले स्टेटस पाहण्यासाठी आतापर्यंत आपण सगळेच युजरच्या नावावर सगळ्यात पहिले क्लिक करतो. त्यानंतर युजरचा डीपी, त्याच्याखाली मोबाईल नंबर, लास्ट सीन आणि मग मजकुरातील स्टेटस; उदाहरणार्थ – बिझी (Busy), हेय देअर आय एम युजिंग व्हॉट्सअ‍ॅप (Hey There! I am using Whatsapp) हे दिसते.

Solar rooftop electricity connection
सरकारने नियम बदलले, आता सौर पॅनल अन् वीज जोडणी तात्काळ मिळणार
OBC
ओबीसींचा खरा शत्रू कोण?
Finance Minister Nirmala Sitharaman
Money Mantra : अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या घोषणेचा तुम्हाला इन्कम टॅक्समध्ये फायदा होणार का?
Morris financial transaction
मॉरिसकडे पिस्तुल ठेवण्यासाठी आर्थिक व्यवहार झाले का ? गुन्हे शाखेकडून आर्थिक व्यवहारांची तपासणी

हेही वाचा…कोणताही ॲप डाउनलोड न करता ‘या’ प्लॅटफॉर्मवर लुटा गेम्सचा आनंद !

पण, आता लवकरच व्हॉट्सअ‍ॅप कंपनी युजर्ससाठी स्टेटससाठी खास अपडेट घेऊन येत आहे. या फीचरचे वैशिष्ट्य म्हणजे आता तुम्हाला युजरचे स्टेटस पाहण्यासाठी त्याच्या प्रोफाइलवर टॅप करण्याची गरज भासणार नाही. तर, तुम्ही चॅटमध्येच युजरने लिहिलेल्या मजकुराचे स्टेटस पाहू शकणार आहात. चॅटमध्ये जिथे युजरचा डीपी असतो; अगदी त्याच्या बाजूला तुम्ही सेव्ह केलेले युजरचे नाव दिसते. इथेच युजरच्या नावाखाली मजकुरात लिहिलेले स्टेटस काही दिवसांत तुम्हाला दिसून येईल. जेव्हा तुम्ही ऑफलाइन असाल तेव्हा लास्ट सीन आणि युजरचा स्टेटस असे तुम्हाला अल्टरनेट दिसून येईल. तसेच तुम्ही व्हाट्सअ‍ॅप सेटिंगमध्ये जाऊन हा बदल अगदी सहज करू शकता.

या फीचरमुळे वापरकर्त्यांना व्हाट्सअ‍ॅप युजरच्या प्रोफाइलवर टॅप न करता, अगदी सहजपणे मजकुरातील स्टेटस पाहता येणार आहे. हे नवीन फीचर सर्व अ‍ॅण्ड्रॉइड युजर्ससाठी उपलब्ध करून दिले जाणार आहे. तसेच आयओएस डिव्हायसेससाठीही कंपनी हे फीचर उपलब्ध करून देणार आहे का? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही आहे. गेल्या वर्षभरात अनेक युजर्सनी या खास फीचरची मागणी केली होती. म्हणून कंपनीने हे फीचर उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे; जे युजर्ससाठी अगदीच उपयुक्त आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: The look of status will change whatsapp might soon start showing status in chat window asp

First published on: 28-11-2023 at 12:56 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×