शाओमीच्या (Xiaomi) चा सब ब्रँड असणाऱ्या Redmi ने भारतात नवीन Redmi Note 12 5Gही सिरीज लाँच केली आहे. या सिरीजमध्ये तीन स्मार्टफोन्स आहेत. रेडमी नोट १२ ५जी( Redmi Note 12 5G) , रेडमी नोट १२ प्रो प्लस ५जी(Redmi Note 12 Pro+ 5G ) आणि रेडमी नोट १२ ५जी(Redmi Note 12 Pro 5G) असे हे तीन स्मार्टफोन आहेत. यातील रेडमी नोट १२ ५जी ची आजपासून भारतात विक्रीसाठी उपल्बध झाला आहे.

रेडमी नोट १२ ५जी आज दुपारी १२ वाजल्यापासून खरेदीसाठी उपलब्ध झाला आहे. हा स्मार्टफोन खरेदी करणारे इच्छुक रेडमी आणि अ‍ॅमेझॉन यांच्या अधिकृत वेबसाइट्सवरून खरेदी करू शकतील. आयसीआयसीआय (ICICI) बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डवर १५०० रुपयांचा डिस्काउंट मिळत आहे.

हेही वाचा : Amazon Sale 2023: अ‍ॅमेझॉन ग्रेट रिपब्लिक सेलमध्ये अनेक वस्तूंवर भरघोस सूट, जाणून घ्या कधीपासून होणार सुरुवात

जाणून घेऊयात फीचर्स

रेडमी नोट १२ ५जी सिरीजमधील व्हॅनिला मॉडेलमध्ये पंच-होल(punch-hole) डिस्प्ले आहे तो प्लास्टिक बिल्ड आहे. या स्मार्टफोनला आयपी५३(IP53) रेटिंग आहे. रेडमी नोट १२ ५जी या स्मार्टफोनमध्ये सैद माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर , आयआर ब्लास्टर आणि ३.५ मिमी इंचाचे हेडफोनचे जॅक आहे. या स्मार्टफोनमध्ये ६.६७ इंचाचा फुल एचडी + AMOLED डिस्प्ले आहे. तसेच १०८०x२४०० पिक्सल रिझोल्युशन आणि १२० Hz असा रिफ्रेश रेट मिळतो. रेडमी नोट १२ ५जी या स्मार्टफोनमध्ये ५०० mAh क्षमतेची बॅटरी असणार आहे. आणि ३३ वॅटचा चार्जर यामध्ये येतो. या फोनचा कॅमेरा हा ट्रिपल कॅमेरा सेटअपसह येतो. यामध्ये ४८ मेगापिक्सलचा बेसिक कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रावाइड आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो शूटरचा समावेश आहे. याचा सेल्फी कॅमेरा ८ मेगापिक्सलचा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जाणून घेऊयात किंमत

या स्मार्टफोनची किंमत 17,999 पासून सुरु होते. यामध्ये ४ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज येते. ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज असलेल्या फोनची किंमत १९,९९९ इतकी आहे.