Google Pixel Phone In India: लॉकडाऊनमुळे चीनमधील वातावरण आणि युनायटेड स्टेट्ससोबत बीजिंगच्या वाढत्या तणावानंतर, अल्फाबेट इंक (GOOGL.O) पिक्सेल फोनचे काही उत्पादन भारतात सुरु करण्याचा विचार करत आहे, अशी माहिती समोर येत आहे. प्राप्त माहितीनुसार, अमेरिकन दिग्गज कंपनी गूगलने भारतातील उत्पादकांकडून ५ लाख ते 1 दशलक्ष पिक्सेल स्मार्टफोन तयार करण्यासाठी निविदा मागवली आहे. हे प्रमाण गूगल पिक्सेल डिव्हाइसच्या वार्षिक उत्पादनाच्या अंदाजे १०% ते २०% आहे.

या वर्षाच्या सुरुवातीला, अल्फाबेट इंकचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुंदर पिचाई यांनी भारतात उत्पादन करण्याच्या योजनेची तपासणी केली होती. अद्याप याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही. या योजनेला आवश्यक मंजुरी मिळाल्यास, भारतातील उत्पादकांना चीनकडून मोबाईलच्या पार्ट्सची आयात करावी लागेल. याशिवाय कंपनी व्हिएतनामचा सुद्धा उत्पादन आधार म्हणून विचार करत आहे.

Tech Viral Video: जास्त काम करताच पळून जाणार संगणकाचा माउस; सॅमसंगचा भन्नाट अविष्कार प्रत्यक्ष पाहा

निक्केईच्या माहितीनुसार, अल्फाबेट व्हिएतनामचा आणखी एक उत्पादन आधार म्हणून विचार करत आहे. विशेष म्हणजे, Apple Inc. आधीपासून Foxconn (2354.TW) आणि विस्ट्रॉन या कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग पार्टनर्सद्वारे भारतात iPhone 13 सहित किमान चार मॉडेल बनवत आहे. अल्फाबेट गूगल पिक्सेल हा आयफोनचा सर्वात मोठा स्पर्धक आहे.

दरम्यान, भारतात सध्या आयफोन १४ चे उत्पादन सुरु करण्याबाबतही चर्चा सुरु आहे. करोनाच्या प्रसारामुळे चीनचे प्रमुख टेक हब शांघायमध्ये लॉक डाउन झाले व जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली. त्यात अलीकडे, अमेरिकेने चीनला काही हाय-एंड चिप्सच्या निर्यातीवर बंदी घातली, ज्यामुळे अनेक मोठ्या कंपनी आपला व्यवसाय व उत्पादन इतर देशांमध्ये हलवण्याच्या तयारीत आहेत. भारतात ही उत्पादन प्रक्रिया सुरु झाल्यास नोकरीच्याही अनेक संधी उपलब्ध होतील.