मेटाच्या मालकीचे व्हाट्सअँप आपल्या वापरकर्त्यांसाठी नेहमीच उपयोगी पडणारी आणि फायदेशीर फीचर्स ऑफर करत असते. ज्यामुळे वापरकर्त्यांना व्हाट्सअँप वापरण्यास सोपे जाते. यामध्ये तुम्ही एकमेकांशी संवाद साधू शकता. व्हॉइस कॉल्स , व्हिडीओ कॉल्स , तुमचे व्हिडीओ किंवा फोटोस स्टेट्सला पोस्ट करणे असे अनेक फीचर्स यात मिळतात. असेच फिचर व्हाट्सअँपमध्ये आहे ते म्हणजे वापरकर्त्यांना त्यांचे लोकेशन व्हाट्सअँपवर इतर कॉन्टॅक्टसमध्ये शेअर करण्याची परवानगी मिळते. तसेच काही ठराविक कालावधीसाठी वैयक्तिक किंवा ग्रुपमध्ये देखील लाईव्ह लोकेशन शेअर करू शकतात.

व्हाट्सअँप वापरकर्ते आपले लाईव्ह लोकेशन शेअर करायचे की नाही ते देखील कंट्रोल करू शकतात. तसेच लाईव्ह लोकेशन शेअर करणे ते कधीही बंद करू शकतात. व्हाट्सअँप या फीचर्ससाठी एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन देखील ऑफर करते. याचाच अर्थ ज्याला तुम्ही लाईव्ह लोकेशन शेअर केले त्याच्याशिवाय दुसरे कोणीही तुमचे लोकेशन पाहू शकत नाही. आता आपण हे लाईव्ह लोकेशन कसे शेअर करायचे व कसे बंद करायचे ते जाणून घेऊयात.

हेही वाचा : Whatsapp Storage: व्हाट्सअँपचे स्टोरेज फुल झाले आहे? ‘या’ सोप्या पद्धतीचा करा वापर अन्…

Step-1. सर्वात प्रथम तुमच्या फोनमध्ये व्हाट्सअ‍ॅप ओपन करा.

Step-2. ज्याला तुमचे लोकेशन शेअर करायचे आहे ते चॅट ओपन करा आणि अटॅच पर्यायावर क्लिक करा.

Step-3. नंतर त्यातील लोकेशन यावर क्लिक करून शेअर लाईव्ह लोकेशन यावर क्लिक करा.

Step-4. तुम्ही शेअर केलेले लाईव्ह लोकेशन ठराविक कालावधीसाठीसुद्धा शेअर करू शकता. तुम्ही सेट केलेल्या वेळेनंतर ते लाईव्ह लोकेशन शेअर होणे बंद होईल.

Step-5. सर्वात शेवटी सेंड बटणावर क्लिक करा.

हेही वाचा : नाव मोठं, लक्षण खोटं: ‘अ‍ॅमेझॉन’मध्ये टॉयलेटला जायचीही चोरी, कर्मचाऱ्यांनी मांडल्या व्यथा

लाईव्ह लोकेशन कसे बंद करायचे ?

Step-1. व्हाट्सअ‍ॅप ओपन करा आणि तुम्हाला जिथे लोकेशन थाम्बवायचे आहे त्या चॅटवॉर क्लिक करा.

Step-2. शेअरिंग बटणावर क्लिक करून स्टॉप बटणावर क्लिक करावे.

अशा प्रकारे तुम्ही व्हाट्सअ‍ॅपवर तुमचे लाईव्ह लोकेशन शेअर करू शकता आणि बंद करू शकता.