Vivo ने आपला नवीन हँडसेट Vivo V25 Pro या आठवड्यात भारतात लॉंच केला आहे. नवीन Vivo फोन रंग बदलणार्‍या फ्लोराइड एजी ग्लास डिझाईनसह येतो. याचा अर्थ फोन सूर्यप्रकाशाच्या संपर्कात आल्यावर मागील पॅनेलचा रंग बदलेल.

Vivo V25 Pro मध्ये MediaTek Dimensity 1300 प्रोसेसर देण्यात आला आहे. यात ४८३० mAh बॅटरी आहे. फोन Android 12 ऑपरेटिंग सिस्टमसह येतो आणि ६४ MP कॅमेरा आहे. Vivo चा हा फोन ३५,९९९ रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध करण्यात आला आहे. हँडसेटला बाजारात आधीपासूनच अस्तित्वात असलेल्या OnePlus 10R कडून तगडी स्पर्धा मिळेल. अलीकडेच OnePlus 10R च्या किमतीत कपात करण्यात आली आहे. किंमत, स्पेसिफिकेशन्सच्या बाबतीत कोणता फोन एकमेकांपेक्षा चांगला आहे? चला या दोन फोनची तुलना करूया…

IPL 2024 Match Ticket Price Updates in Marathi
IPL 2024 : गुणतालिकेत नीचांकी, तिकीटं उच्चांकी; आरसीबीच्या मॅचच्या तिकिटाला मात्र ५० हजारांचा भाव
Thipse and Gokhale
हम्पीकडून सर्वाधिक अपेक्षा! ‘कॅन्डिडेट्स’ बुद्धिबळ स्पर्धेबाबत ठिपसे, गोखले यांचे मत
two women fighting for seats in Delhi bus shocking video goes viral on social media
‘सीट’वरून दोन महिलांमध्ये तुफान राडा, एकमेकींच्या झिंज्या उपटल्या, VIDEO होतोय व्हायरल
Virat Kohli and Gautam Gambhir hugging each other
RCB vs KKR : विराट-गौतमने जिंकली सर्वांची मनं, गतवर्षातील वाद विसरुन एकमेकांची घेतली गळाभेट, VIDEO व्हायरल

Vivo V25 Pro vs OnePlus 10R Display
Vivo V25 Pro स्मार्टफोनमध्ये ६.५६ इंचाचा डिस्प्ले आहे जो फुलएचडी + (२३७६×१०८० पिक्सेल) रिझोल्यूशन ऑफर करतो. स्क्रीनचा रिफ्रेश रेट १२० Hz आहे आणि तो HDR10+ प्रमाणित आहे. दुसरीकडे, OnePlus 10R मध्ये ६.७ इंच फुलएचडी + डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन (२४१२×१०८० पिक्सेल) आहे. स्क्रीन ६० ते १२० Hz च्या अनुकूल रिफ्रेश रेटसह येते. यात कॉर्निंग गोरिल्ला ग्लास संरक्षण आहे आणि त्याची पिक्सेल घनता ३९४ ppi आहे.

आणखी वाचा : Whatsapp यूजर्ससाठी आनंदाची बातमी! आता डिलीट केलेला मेसेज परत मिळणार

Vivo V25 Pro vs OnePlus 10R OS, Ram, Storage, Processor
Vivo V25 Pro आणि OnePlus 10R स्मार्टफोन Android 12 सह येतात. दोन्ही फोनमध्ये कंपनीचा कस्टम UI (Vivo च्या फोनमध्ये FunTouch OS 12 आणि OnePlus फोनमध्ये OxygenOS 12) आहे. प्रोसेसर बद्दल बोलायचे झाले तर Vivo चा फोन MediaTek Dimensity 1300 सह येतो तर OnePlus 10R मध्ये MediaTek Dimensity 8100 प्रोसेसर येतो.
Vivo V25 Pro स्मार्टफोनमध्ये ८ GB रॅम आणि १२ GB रॅमसह १२८ GB आणि २५६ GB स्टोरेजचा पर्याय आहे. विवोच्या फोनमध्ये ८ जीबी व्हर्च्युअल रॅमचा पर्यायही आहे. OnePlus 10R ८ GB रॅमसह १२८ GB आणि १२ GB रॅमसह २५६ GB स्टोरेजमध्ये देखील उपलब्ध आहे.

Vivo V25 Pro vs OnePlus 10R OS Camera
Vivo V25 Pro मध्ये ६४ मेगापिक्सेल प्रायमरी, ८ मेगापिक्सेल अल्ट्रावाइड आणि २ मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सर्स आहेत. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी हँडसेटमध्ये ३२ मेगापिक्सेल कॅमेरा उपलब्ध आहे.

दुसरीकडे, OnePlus 10R मध्ये ५० मेगापिक्सेल प्रायमरी सेन्सरसह ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. फोनमध्ये ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड-एंगल आणि २ मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनमध्ये १६ मेगापिक्सेल फ्रंट कॅमेरा आहे.

Vivo V25 Pro vs OnePlus 10R Battery
Vivo V25 Pro स्मार्टफोनमध्ये ४८३० mAh बॅटरी आहे जी ६६ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. OnePlus 10R बद्दल बोलायचे झाल्यास, या फोनमध्ये ५००० mAh बॅटरी आहे जी ८० W चार्जिंगला सपोर्ट करते. पण १२ GB रॅम आणि २५६ GB स्टोरेज व्हेरिएंट १५० W चार्जिंग सपोर्टसह लॉंच करण्यात आला आहे.

Vivo V25 Pro vs OnePlus 10R Price in india
Vivo V25 Pro च्या ८ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३५,९९९ रुपये आणि १२ GB रॅम आणि २५६ GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३९,९९९ रुपये आहे.
OnePlus 10R च्या ८ GB रॅम आणि १२८ GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत देशात ३४,९९९ रुपयांपासून सुरू होते. फोनच्या १२ GB रॅम आणि २५६ GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ८० W फास्ट चार्जिंगसाठी ३८,९९९ रुपये आणि १५० W चार्जिंगसाठी ३९,९९९ रुपये असेल.