Vivo ने आपल्या Y-सीरीजचा नवीन स्मार्टफोन लॉंच केला आहे. Vivo Vivo Y22s चा हा नवीन बजेट फोन 4G स्मार्टफोन आहे आणि तो स्नॅपड्रॅगन प्रोसेसर सह येतो. हा फोन सध्या व्हिएतनाममध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. हा Vivo फोन पॉली कार्बोनेट बॉडीसह फ्लॅट फ्रेमसह येतो. Vivo Y22S ड्युअल रियर कॅमेरा सेटअप, सिंगल रॅम व्हेरिएंटमध्ये लॉंच करण्यात आला आहे. जाणून घ्या स्मार्टफोनची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स…

Vivo Y22s Price
Vivo Y22S स्मार्टफोन सिंगल स्टोरेज व्हेरिएंटमध्ये येतो. ८ GB रॅम आणि १२८ GB इनबिल्ट स्टोरेज व्हेरिएंटसह Vivo फोनची किंमत ५९,९०,००० VND (सुमारे २०,५०० रुपये) आहे. डिव्हाईस स्टारलाईट ब्लू आणि समर स्यान कलरमध्ये येतो. Vivo Y22S च्या भारतात लॉंच बद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Realme P1 Realme P1 Pro martphones will be available for purchase with Bank offers discounts and more
50MP कॅमेरा अन् फास्ट चार्जिंग सपोर्ट; रिअलमीच्या ‘या’ बजेट फ्रेंडली फोनची आज पहिली विक्री, जाणून घ्या आकर्षक सवलती
salman khan first post after firing at home
घरावर गोळीबार झाल्यानंतर सलमान खानची पहिली पोस्ट, व्हिडीओ केला शेअर
Motorola launches Edge 50
बाकी कंपन्यांची उडाली झोप, मोटोरोलाचा जबरदस्त डिस्प्लेसह स्मार्टफोन देशात दाखल, मिळताहेत भरमसाठ ऑफर्स
Yamaha introduces vibrant new color options across the MT15 V2 Fascino and Ray ZR portfolios Know Features And price
ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह यामाहा इंडियाने ‘या’ दुचाकींना केलं उपडेट; पाहा कलर ऑप्शन…

आणखी वाचा : Vivo V25 Pro vs OnePlus 10R: Android 12 चा कोणता मिड-रेंज फोन सर्वात बेस्ट? जाणून घ्या

Vivo Y22s Specifications
Vivo Y22S मध्ये ६.५५ इंचाचा IPS LCD डिस्प्ले आहे. स्क्रीनवर वॉटर ड्रॉप नॉच उपलब्ध आहे. स्क्रीनचे रिझोल्यूशन HD + आहे आणि रिफ्रेश रेट ६० Hz आहे. हँडसेटमध्ये पातळ बेझल्स देण्यात आले आहेत. स्क्रीन-टू-बॉडी रेशो ८९.७ टक्के आहे. स्मार्टफोनचे वजन १९२ ग्रॅम आहे. हँडसेटची परिमाणे १६४.३०×७६.१०×८.३८ mm आहेत. हा फोन Android 12 आधारित Funtouch OS 12 सह येतो.

Vivo Y22S च्या डिस्प्लेवर ८ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा ड्यू-ड्रॉप नॉचमध्ये देण्यात आला आहे. फोनच्या मागील बाजूस डुअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. हँडसेटमध्ये ५० मेगापिक्सेल प्रायमरी आणि २ मेगापिक्सेल मॅक्रो सेन्सर असून अपर्चर F/१.८ आहे. फोनच्या काठावर फिंगरप्रिंट स्कॅनर उपलब्ध आहे.

Vivo Y22s ला पॉवर देण्यासाठी ५००० mAh बॅटरी देण्यात आली आहे जी १८ W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. फोनमध्ये चार्जिंगसाठी USB Type-C फीचर देण्यात आले आहे. हँडसेटमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 680 प्रोसेसर देण्यात आला आहे.