भारतामध्ये सध्या Reliance Jio, Airtel आणि VI या प्रमुख टेलिकॉम कंपनी आहेत. देशामधील अनेक शहरांमध्ये जिओ आणि एअरटेल या कंपन्यांनी आपले ५जी नेटवर्क सुरु केले आहे. मात्र या दोन कंपन्यांनी आपले ५ जी नेटवर्क सुरु केले असले तरी अजूनही VI ला आपले ५जी नेटवर्क सुरु करता आलेले नाही आहे. मात्र Vi कधी ५जी नेटवर्क सुरु करणार याची वापरकर्ते आतुरतेने वाट पाहत आहेत. आता मात्र या कंपनीच्या वापरकर्त्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. अखेर कंपनीने देशभरामध्ये ५जी सेवा सुरु करण्यासाठी तयारी सुरु केली आहे.
लवकरच लॉन्च होणार VI ची ५जी सर्व्हिस
आदित्य ग्रुप ऑफ बिर्लाचे अध्यक्ष कुमार मंगलम बिर्ला यांनी CNBC-TV18 ला नुकतीच एक मुलाखत दिली. लवकरच वोडाफोन-आयडिया आपली ५जी सर्व्हिस सुरु करण्याची योजना आखत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ही घोषणा अशा वेळी झाली आहे ज्यावेळी VI ५जी नेटवर्क नसल्यामुळे आपले ग्राहक गमावत होता. यामुळे टेलिकॉम क्षेत्रामध्ये फक्त जिओ आणि एअरटेल या दोन कंपन्या आघाडीवर राहतील असे वाटत होते.
Vodafone-Idea ने त्याच्या आगामी ५जी नेटवर्कसाठी Motorola आणि Xiaomi स्मार्टफोन कंपन्यांसोबत सहयोग केला आहे. Vodafone-Idea ने त्याच्या आगामी 5G सेवेसाठी Motorola आणि Xiaomi स्मार्टफोन कंपन्यांसोबत सहकार्य केले आहे. सध्या VI ही एक कंपनी आहे जिने ५जी सेवा सुरु केलेली नाही. तथापि कुमार मंगलम बिर्ला यांनी जरी स्पष्ट केले असले की लवकरच VI ५जी सेवा सुरु करेल. असे असले तरी त्यांनी कोणतीही तारीख जाहीर केलेली नाही.
Airtel ची ५ जी सेवा इतक्या शहरात झाली सुरू
Airtel ने नवीन २३५ शहरांमध्ये 5G Plus लॉन्च केल्यानंतर आता देशभरातील ५०० शहरांमधील ग्राहकांसाठी एअरटेल ५जी नेटवर्क उपलब्ध असणार आहे. त्याच वेळी जीओला मागे टाकत देशातील ५०० शहरांमध्ये ५जी इंटरनेट सेवा सुरु करणारी पहिली टेलिकॉम कंपनी आहे. एअरटेल ही देशातील ५जी सेवा सुरु करणारी कंपनी आहे. Airtel ने हैदराबादमध्ये भारतातील पहिले लाइव्ह 5G नेटवर्क सादर केले होते. तसेच बंगळुरूमधील BOSCH सुविधेमध्ये भारतातील पहिले खाजगी 5G नेटवर्क देखील सादर केले होते.