इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म असलेले व्हॉट्सअ‍ॅप आपल्या वापरकर्त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने काही ना काही अपडेट घेऊन येत असते. वापरकर्त्यांसाठी व्हॉट्सअ‍ॅप हे सुरक्षित प्लॅटफॉर्म असल्याचा विश्वास त्यामागून कंपनी देत असते. याआधी देखील कंपनीने वापरकर्त्यांसाठी सेफ्टी फीचर्स लॉन्च केले आहेत. आता पुन्हा एकदा मूळ कंपनी मेटाने व्हाट्सअ‍ॅपसाठी काही नवीन सिक्युरिटी फीचर्सची घोषणा केली आहे.कंपनीने तीन सेफ्टी फीचर्सची यादी जाहीर केली आहे.

WhatsApp ने सांगितले की, येत्या काही महिन्यांमध्ये हे फीचर्स सर्वांसाठी लॉन्च केली जाणार आहेत. या तीन सेफ्टी फीचर्समुळे हॅकर्स तुमच्या अकाउंटशी छेडछाड करू शकणार नाहीत. वापरकर्त्यांची चॅटिंग करणे अधिक सुरक्षित होणार आहे. कंपनीने घोषणा केलेल्या या तीन फीचर्सबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

हेही वाचा : Salesforce मधून नोकरी गेल्यावर महिला कर्मचारी भावूक; पोस्ट शेअर करत म्हणाल्या, “मला सुरुवातीला…”

Account Protect

आतापर्यंत कोणी वापरकर्ता एका डिव्हाइसमधून दुसऱ्या डिव्हाइसमध्ये स्विच झाला तर तेव्हा कोणत्या प्रकारची चौकशी केली जात नव्हती. चौकशी होत नसल्यामुळेच हॅकर्स या लूपचा वापर हॅकिंग करण्यासाठी करू शकतात. यामुळे व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांसाठी त्यांचे अकाउंट नवीन डिव्हाइसवर स्विच करण्याच्या प्रक्रियेला अधिक सुरक्षित करणार आहे. कंपनीचे म्हणणे आहे की, आतापासून, कंपनी अतिरिक्त सुरक्षा तपासणी म्हणून वापरकर्त्यांना त्यांच्या जुन्या डिव्हाइसवर त्यांची ओळख व्हेरीफाईड करण्यास सांगू शकते. याबाबत स्पष्टीकरण देताना कंपनीने एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे, ते नवीन अकाउंट प्रोटेक्ट फिचर तुम्हाला तुमचे अकाउंट दुसऱ्या डिव्हाइसवर हलवण्याच्या अनधिकृत प्रयत्नांबद्दल सूचित करण्यात मदत करेल.

Divice Verification

मोबाइल डिव्हाइस मालवेअर आज गोपनीयता आणि सुरक्षिततेसाठी सर्वात मोठा धोका आहे. कारण ते वापरकर्त्यांच्या परवानगीशिवाय त्यांच्या फोनवर प्रवेश करतात. हॅकर्स युजर्सच्या व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करून मालवेअरद्वारे चुकीचा मेसेज पाठवू शकतात. यासाठी WhatsApp ने वापरकत्यांचे अकाऊंट सुरक्षित राहावे म्हणून हे डिव्हाईस वेरिफिकेशनचे फिचर आणणार आहे.

हेही वाचा : 5G फोनवर मिळतेय बंपर डिस्काउंट, iPhone 13, Pixel 6a चा ही यादीत समावेश, खरेदीसाठी लागल्या हजारो ग्राहकांच्या रांगा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

Automatic Security Code

तुम्ही जे चॅटिंग करत आहात ते सुरक्षित आहे की नाही हे कळण्यासाठी हे फिचर तुम्हाला मदत करणार आहे. तुम्ही कॉन्टॅक्ट इन्फोमध्ये जाऊन encryption tab च्या मदतीने मॅन्युअल स्वरूपात याची पडताळणी करू शकता. ही प्रक्रिया सर्वांसाठी सोपी व्हावी यासाठी WhatsApp ने “की पारदर्शकता” या प्रक्रियेवर आधारित एक सुरक्षा फिचर सादर केले आहे. जे तुमच्याकडे सुरक्षित कनेक्शन असल्याचे ऑटोमेटिकपणे व्हेरीफाईड करण्यास परवानगी देते. कंपनीने सांगितले, याचा अर्थ असा आहे, जेव्हा तुम्ही एन्क्रिप्शन टॅबवर क्लिक कराल. तेव्हा तुमचे चॅटिंग सुरक्षित आहे की नाही हे तुम्ही व्हेरीफाईड करू शकणार आहात.