अनोख्या फीचर्समुळे व्हॉट्सअ‍ॅप मेसेंजर हे सर्वांना भुरळ घालते. मात्र, लाखो व्हॉट्सअ‍ॅप युजर्सचा डेटा हा हॅकर्सच्या हाती लागला असून त्याची विक्री होत असल्याचे एका अहवालातून समोर आले आहे. व्हॉट्सअ‍ॅप डेटामध्ये फोन नंबर आहेत. सायबरन्यूजनुसार, एका हॅकरने वेगवेगळ्या देशांतील ५०० दशलक्ष व्हॉट्सअ‍ॅप वापरकरत्यांचा डेटा हॅकिंग फॉरमवर विक्रीसाठी पोस्ट केला आहे.

अहवालानुसार, डेटामध्ये ४८७ दशलक्ष व्हॉट्सअ‍ॅप युजरचा समावेश आहे, जो की फार मोठा आकडा आहे. हे वापरकर्ते ८४ देशांचे आहेत आणि या यादीत अमेरिका, यूके, इटली, इजिप्त आणि भारतातील काही वापरकर्त्यांचा समावेश आहे. इजिप्तमधील ४५ दशलक्ष, इटलीतील ३५ दशलक्ष आणि अमेरिकेतील जवळपास ३२ दशलक्ष व्हॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांचा डेटा विक्रीसाठी पोस्ट करण्यात आला आहे.

(संगणक, लॅपटॉपची गती कमी झाली? डिलीट करा ‘हा’ डेटा, कार्यक्षमता वाढण्यास होईल मदत)

इतक्या रुपयांमध्ये विक्री

हॅकरने देशाच्या आधारावर वापरकर्त्यांच्या डेटाची किंमत ठरवल्याचे दिसून येते. अहवालानुसार, अमेरिकेचा डेटा जवळपास ५ लाख ६१ हजार ८०० रुपयांमध्ये, युकेचा डेटा जवळपास १ लाख ६१ हजार ८०० रुपये आणि जर्मनीचा डेटा जवळपास २ लाख ४ हजार १०० रुपयांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. व्हॉट्सअ‍ॅप युजर्सचा डेटा कसा मिळाला? याबाबत हॅकरने माहिती शेअर केलेली नाही.

व्हॉट्सअ‍ॅप हे मेटाच्या मालकीचे प्लाटफॉर्म असल्याने याबाबत आश्चर्य वाटत नाही. कारण अलिकडच्या काळात हॅकर्सनी फेसबुक युजर्सचा डेटा असल्याचाही दावा केला होता. हा डेटा योग्य किंमत मोजणाऱ्या व्यक्तींसाठी उपलब्ध करण्यात आला होता. यावरून मेटाचे फ्लाटफॉर्म्स किती सुरक्षित आहे याची माहिती मिळते.

(काय सांगता! यूपीआय अ‍ॅप्सवरून आर्थिक व्यवहारांना लागू शकते मर्यादा, काय आहे कारण? जाणून घ्या)

या कामासाठी व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकाचा वापर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फिशिंग आणि स्पॅमिंग करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक हे शक्तिशाली साधन बनले आहे. तुम्हाला अनोळखी व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावरून मेसेज आल्यास त्यातील कोणत्याही संकेतस्थळासंबंधी लिंकवर क्लिक करू नका आणि संभाषण टाळा. हॅकर्स या पद्धतींचा वापर मालवेअरद्वारे तुमचे डिव्हाइस संक्रमित करण्यासाठी करू शकतात, ज्याने तुमच्या डिव्हाइसवर रिमोट एक्सेस मिळण्यात मदत होऊ शकते. त्यामुळे अनोळखी व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावरून मेसेज आल्यास त्यास टाळा.