WhatsApp New Features Launch:- व्हॉट्सॲप हा एक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. व्हॉट्सॲप हा आपल्या दैनंदिन जीवनाचा जणू एक भाग झाला आहे. एकमेकांना संदेश पाठवणं, लांबच्या व्यक्तीशी व्हिडीओ कॉलवर संवाद साधणं, घरबसल्या स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ आवडत्या व्यक्तीला पाठवणं, तसेच कामासंबंधित अनेक गोष्टींसाठी व्हॉट्सॲपचा वापर करण्यात येतो. मेटाच्या मालकीचा असणारा व्हॉट्सॲप नेहमीच आपल्या युजर्सना नवनवीन फिचर्स, इंटरेस्टिंग अपडेट लाँच करून देत असतो. आतापर्यंत आपण सगळ्यांनी ग्रुप चॅट, ग्रुप व्हिडीओ कॉल, ग्रुप कॉलिंग अश्या वेगवेगळ्या फिचर्सचा अनुभव घेतला, पण आता सगळ्यांना “ग्रुप वॉईज चॅट” या नव्या फिचरचासुद्धा अनुभव घेता येणार आहे. मेटाने (Meta) “ग्रुप वॉईज चॅट” (Voice Chat Feature For Group Conversations ) फिचर लाँच केले आहे. या फिचरमध्ये कोणताही मजकूर न लिहिता तुम्ही स्वतःच्या आवाजाच्या मदतीने ग्रुपमधल्या सदस्यांशी संवाद साधू शकता. तुमच्या आवाजाच्या मदतीने तुम्ही इतरांशी सहजरित्या संवाद साधू शकता.

(IANS ) यांच्या ट्विटनुसार मेटा मालकीचे मेसेजिंग ॲप ‘व्हॉट्सॲप’ ग्रुप संवादासाठी आणखीन एक सोईस्कर फिचर लाँच करत आहे, असे त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून शेअर केलं आहे. यात आपण बाकी ग्रुप चॅटमध्ये जसे सहभागी होतो; तसे यातदेखील सहभागी होऊ शकणार आहोत. ‘वॉईज मेसेज’ हे फिचर आधीपासून होतेच, पण “ग्रुप वॉईज चॅट” फिचरचा अनुभव यापेक्षा थोडा वेगळा असणार आहे. यामध्ये तुम्ही एकापेक्षा अनेक लोकांशी फक्त तुमच्या आवाजाच्या मदतीने संवाद साधू शकणार आहात. हे फिचर सगळ्यात पहिल्यांदा अँड्रॉइड युजर्ससाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

हेही वाचा :- पाण्यात लपलेल्या चिंबोऱ्या पकडण्यासाठी तरुणाने केला देशी जुगाड, गावाकडच्या पोराचा टॅलेंट पाहिलात का?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“ग्रुप वॉईज चॅट” फिचर कसं असेल?

“ग्रुप वॉईज चॅट” हा एक प्रायव्हेट ग्रुप चॅट असणार आहे. तुम्ही निवडलेले सदस्यच यामध्ये सहभागी होऊ शकणार आहेत. व्हॉट्सॲपचा कोणताही युजर हा ‘ग्रुप वॉईज चॅट’ क्रिएट करू शकणार आहे. तसेच “वॉईज चॅट” कनेक्ट करण्यासाठी तुम्हाला तुमच्या ग्रुपमध्ये एक आयकॉंन दिसेल, त्यावर क्लिक करून तुम्ही आपोआप हे कनेक्ट करू शकता. त्याचबरोबर जर तुम्ही ग्रुपचे सदस्य असाल तर तुम्ही स्वतःहून “वॉईज चॅट”शी कनेक्टदेखील होऊ शकता. जसे आपण ग्रुप व्हिडीओ कॉल या फिचरमध्ये कनेक्ट होतो. आणि तुम्ही तुमच्या सोयीनुसार या “वॉईज कॉल” मधून बाहेरदेखील पडू शकता‌. या “ग्रुप वॉईज चॅट”च्या ६० मिनिटांच्या कालावधीत कोणी यात सहभागी झालं नाही तर हा कॉल आपोआपच बंद होऊन जाईल. यात ३२ किंवा त्या पेक्षा जास्त सदस्य एकाच वेळी कनेक्ट होऊ शकतात. या व्हॉट्सॲपच्या नवीन फिचरमुळे तुम्हाला सतत एखादा संदेश लिहून पाठवण्याची गरज भासणार नाही आणि हा व्हॉईस चॅट फिचर प्रत्येक ग्रुपसाठी शक्य असणार आहे. या फिचरमुळे कोणालाही पर्सनल कॉल न करता एकाचवेळी तुम्ही अनेकांशी बोलू शकता.