WhatsApp Search Messages by Date Feature : व्हॉट्सॲपने अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी एक भन्नाट फीचर आणले आहे. या नव्या फीचरमुळे वापरकर्ते त्यांना हव्या त्या तारखेनुसार चॅट्स शोधू शकतात असे समजते. खरंतर हे फीचर आयओएस [iOS], मॅक डेक्सटॉप आणि व्हॉट्सॲप वेब यांसारख्या ठिकाणी उपलब्ध आहे, पंरतु आता मात्र या फीचरचा वापर अँड्रॉइड वापरकर्त्यांनादेखील करता येणार आहे. फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी त्यांच्या व्हॉट्सॲप चॅनेलवर ही माहिती दिली आहे. या फीचरचा वापर करून, मार्क झुकरबर्ग यांनी त्यांचे एक जुने चॅट शोधून दाखवले असल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. तुम्हाला जर एखाद्या ठराविक तारखेचे चॅट शोधायचे असल्यास, आता जुने चॅट्स स्क्रोल करत शोधू नका. त्याऐवजी, झटक्यात तारखेनुसार चॅट्स शोधा.

तारखेनुसार चॅट शोधण्याचे फीचर अँड्रॉइडमध्ये वापरण्याच्या स्टेप्स पाहा. [How to search by date feature on Android]

  • प्रथम फोनमध्ये व्हॉट्सॲप उघडावे.
  • तुम्हाला ज्याचे जुने चॅट्स शोधायचे असेल, अशा एखाद्या ग्रुप किंवा वैयक्तिक चॅटमध्ये जावे.
  • चॅटमध्ये जाऊन चॅट डिटेल्स हा पर्याय शोधा. साधारण हा पर्याय उजव्या कोपऱ्यात दिसणाऱ्या तीन ठिपके किंवा लाईन असते त्या ठिकाणी असतो. आता त्यामध्ये मेन्यू पर्यायावर क्लिक करा.
  • चॅट डिटेल्समध्ये दिसणाऱ्या अनेक पर्यायांपैकी, स्क्रीनवरील सर्च हा पर्याय शोधा आणि त्यावर क्लिक करा.
  • आता तुम्हाला स्क्रीनवर कॅलेंडर आयकॉन दिसेल, त्यावर क्लिक करून त्याला ॲक्सेस द्या.
  • आता स्क्रीनवर तुम्हाला एक कॅलेंडर दिसेल, त्यावर तुम्हाला हवा तो महिना किंवा तारीख पाहण्यासाठी स्क्रोल करता येऊ शकते.
  • आता तुम्हाला हवी असलेली तारीख सिलेक्ट करा.
  • तुम्ही तारीख सिलेक्ट केल्यानंतर, स्क्रीनवर बरोबर त्या दिवसाचे चॅट्स दिसू लागतील.
  • समोर आलेल्या चॅटमधून तुम्हाला हवी असलेली माहिती घ्या.

हेही वाचा : आता WhatsApp वर मेसेज वाचले तरी कुणाला कळणार नाही; हे कसे करायचे ते पाहा

Can eggs help diabetic patient to control blood sugar
मधुमेही व्यक्तींनी अंडी खाल्ल्यास रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात..
how to make fish egg omelette Fish egg recipe in marathi
झटपट नाश्त्यासाठी बनवा “माशाच्या अंड्याचे ऑमलेट” लहान मुलंही खातील आवडीने
How To Identify Mangoes Without Adulteration Five Signs
गोड, रसाळ आंबा निवडताना ‘या’ खुणांकडे असू द्या नजर; तज्ज्ञांनी सांगितली भेसळ ओळखण्याची योग्य पद्धत
Google maps using AI new updates
आत Google map सुद्धा वापरणार AI! पाहा अॅपमधील ३ बदल; जाणून घ्या काय आहेत नवीन फीचर्स….

एका आठवड्यापूर्वीच व्हॉट्सॲपने टेक्स्ट फॉरमॅटिंग फीचरची घोषणा केली होती. या फीचरमध्ये बुलेट लिस्ट, नंबर लिस्ट, ब्लॉक कोट्स आणि इनलाईन कोड या सगळ्यांचा समावेश करण्यात आला आहे; असे कंपनीने सांगितले होते. हे फीचर आयओएस, अँड्रॉइड, वेब आणि मॅकसाठी उपलब्ध आहेत. तसेच या फीचरचा वापर हा ग्रुप चॅट, वैयक्तिक चॅट तसेच चॅनेल ब्रॉडकास्टिंग फीचरमध्येही केला जाऊ शकतो.

हे फीचर कसे वापरायचे ते पाहा

  • बुलेट लिस्ट तयार करण्यासाठी : – हे चिन्ह आणि स्पेस द्यावी.
  • नंबर लिस्ट तयार कारणासाठी : आकडा लिहून त्यापुढे पूर्णविराम देऊन स्पेस द्यावी [उदा. १.]
  • ब्लॉक कोट लिहिण्यासाठी : लिहिलेला मजकूर हायलाईट करण्यासाठी > या चिन्हाचा वापर करून नंतर स्पेस द्यावी.
  • इनलाईन कोड लिहिण्यासाठी : मजकुराच्या सुरुवातीस आणि शेवटी ` या चिन्हाचा वापर करावा [उदा. `Hello`]