scorecardresearch

Amazon Prime चे बेस्ट प्लॅन्स कोणते? पाहा संपूर्ण यादी

Amazon Prime च्या कोणत्या प्लॅन्सची निवड फायदेशीर ठरेल? जाणून घ्या प्लॅन्सची किंमत आणि त्यावरील ऑफर

Amazon Prime चे बेस्ट प्लॅन्स कोणते? पाहा संपूर्ण यादी
अ‍ॅमेझॉन प्राईमचे बेस्ट प्लॅन्स (Photo: Indian Express)

अ‍ॅमेझॉन प्राईमकडुन युजर्ससाठी स्वस्त आणि आकर्षक ऑफर्स असणारे प्लॅन्स सतत लाँच केले जातात. त्यापैकी नेमका कोणता प्लॅन निवडावा, कोणता प्लॅन बेस्ट आहे जाणून घ्या. अलीकडेच अ‍ॅमेझॉनने ९९९ रुपयांचा नवा ‘अ‍ॅमेझॉन प्राईम लाईट’ प्लॅन लाँच केला आहे. हा प्लॅन वर्षभरासाठी उपलब्ध होतो. याआधी वर्षभरासाठी उपलब्ध होणारे दोन प्लॅन्स अ‍ॅमेझॉन प्राईमवर उपलब्ध आहेत. या प्लॅन्सची किंमत ५९९ आणि १४९९ रूपये आहे. या दोन आणि आता लाँच झालेल्या नव्या प्लॅनवर कोणत्या ऑफर्स आहेत जाणून घ्या.

अ‍ॅमेझॉन प्राईम मोबाईल एडीशन

 • या प्लॅनची किंमत ५९९ रुपये आहे.
 • अ‍ॅमेझॉन प्राईम मोबाईल एडीशन प्लॅनमध्ये केवळ मोबाईलवरच व्हिडीओ, चित्रपट पाहता येतात.
 • हा प्लॅन निवडून टीव्ही किंवा लॅपटॉपमध्ये चित्रपट पाहता येत नाहीत.
 • या प्लॅनवर अ‍ॅमेझॉनवरील सर्व कंटेन्ट (नवीन चित्रपट, अ‍ॅमेझॉन ओरिजिनल,लाईव्ह क्रिकेट) उपलब्ध होतो.
 • एकावेळी फक्त एकाच फोनवर अ‍ॅमेझॉन प्राईमवर लॉगइन करता येईल.

आणखी वाचा: घरबसल्या मोबाईलवर मिळवा डिजिटल वोटर आयडी; कसे डाउनलोड करायचे जाणून घ्या

अ‍ॅमेझॉन प्राईम लाईट

 • या प्लॅनची किंमत ९९९ रूपये आहे.
 • हा प्लॅन वर्षभरासाठी उपलब्ध होतो.
 • यामध्ये टीव्हीवर देखील लॉग इन करता येते.
 • हा प्लॅन घेतल्यास दोन डिव्हायसेसमध्ये लॉग इन करता येते, ज्यापैकी एक डिवाईस फोन असणे आवश्यक आहे.
 • गाणी, प्राइम गेमिंग, प्राइम ई-बुक यांचा ॲक्सेस मिळत नाही.
 • अ‍ॅमेझॉनच्या २ दिवसांत डिलीवरीची सुविधा मिळते.

अ‍ॅमेझॉन प्राईम

 • या प्लॅनची किंमत १४९९ आहे.
 • हा प्लॅन वर्षभरासाठी उपलब्ध होतो.
 • हा प्लॅन निवडुन टीव्ही, मोबाईल आणि टॅबवरही लॉगइन करता येते, म्हणजेच ३ डिव्हायसेसमध्ये लॉगइन करता येते.
 • या प्लॅनसह एका दिवसात किंवा ऑर्डर केलेल्या दिवशीच डिलीवरी मिळण्याची सुविधा उपलब्ध होते.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 19-01-2023 at 18:57 IST

संबंधित बातम्या