scorecardresearch

Xiaomi चा तीन 50MP-50MP कॅमेरे असलेल्या फोनचा पहिला सेल सुरू, जाणून घ्या ऑफर

आघाडीची स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi ने अलीकडेच त्यांचे तीन 50MP-50MP कॅमेरे असलेला फोन Xiaomi 12 Pro 5G भारतात लॉन्च केला आहे. याचा सेल आज Amazon आणि Mi.com वर सुरु झाला आहे.

Xiaomi-12-Pro-5g-
(फोटो-mi.com)

आघाडीची स्मार्टफोन निर्माता कंपनी Xiaomi ने अलीकडेच त्यांचे तीन 50MP-50MP कॅमेरे असलेला फोन Xiaomi 12 Pro 5G भारतात लॉन्च केला आहे. याचा सेल आज Amazon आणि Mi.com वर सुरु झाला आहे. या फोनमध्ये तुम्हाला 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट Snapdragon 8 Gen 1 चिपसेट देण्यात आला आहे. हा फोन OnePlus 10 Pro 5G शी तगडी स्पर्धा करतो, जो नुकताच भारतात लॉन्च झाला होता. OnePlus फोनची सुरुवातीची किंमत ६६,९९९ रुपये आहे.

Xiaomi 12 Pro किंमत आणि ऑफर
Xiaomi 12 Pro 5G फोन दोन रॅम व्हेरिएंट ऑफर करतो. 8GB RAM + 256GB व्हेरिएंटची किंमत ६२,९९९ रुपये आणि 12 GB RAM + 256 GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ६६,९९९ रुपये आहे. या फोनच्या कलरबद्दल बोलायचं झालं तर, हा Couture Blue, Nor Black आणि Olive Mauve कलर व्हेरिएंटसह येतो.

सेल ऑफरबद्दल बोलायचं झालं तर, ICICI बँक कार्ड वापरून तुम्हाला ६००० पर्यंत झटपट सूट मिळू शकते. तर, कूपन वापरून तुम्ही ४००० रुपयांपर्यंत सूट देखील मिळवू शकता. या सवलतीनंतर बेस व्हेरिएंटची किंमत ५२,९९९ रुपये आणि दुसऱ्या व्हेरिएंटची किंमत ५६,९९९ रुपये असेल.

Xiaomi 12 Pro 5G स्पेसिफिकेशन्स आणि फिचर्स
Xiaomi 12 Pro 5 मध्ये 6.73 इंचाचा WQHD + 120Hz AMOLED डिस्प्ले आहे. LTPO2 पॅनेल रीफ्रेश रेट 1Hz इतका कमी करण्याची परवानगी देतो. चांगला गेमिंग अनुभव देण्यासाठी फोनला 480Hz टच सॅम्पलिंग रेट देखील मिळतो. हा स्मार्टफोन हार्मन कार्डनच्या ड्युअल स्पीकर्ससह येतो आणि डॉल्बी अॅटमॉसला सपोर्ट करतो. स्मार्टफोन Snapdragon 8 Gen 1 चिपसेटसह मिळतो आणि 12GB RAM सह जोडलेला आहे. हे Android 12-आधारित MIUI वर चालतं.

आणखी वाचा : Motorola ने लॉन्च केला ढासू स्मार्टफोन, 50MP आणि 32MP चा सेल्फी कॅमेरा आणि बरंच काही….जाणून घ्या किंमत

कॅमेरा आणि बॅटरी
Xiaomi 12 Pro 5G मध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. एक 50-मेगापिक्सेल Sony IMX707 वाइड-अॅंगल प्रायमरी सेन्सर, 50 मेगापिक्सेल टेलिफोटो लेन्स आणि 50 मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड-अॅंगल लेन्स, सेल्फी आणि व्हिडीओ कॉलसाठी 32 मेगापिक्सेल फ्रंट फेसिंग कॅमेरा येतो. यात 4,600mAh बॅटरी मिळते, जी 120W हायपरचार्ज टेक्नॉलॉजीला सपोर्ट करतं. हे 50W वायरलेस फास्ट चार्जला देखील सपोर्ट करतं.

कंपनीचा दावा
Xiaomi च्या मते, 12 Pro ला बूस्ट मोड अंतर्गत २० मिनिटांत १०० टक्के पर्यंत चार्ज करता येऊ शकतं. स्टॅंडर्ड मोड अंतर्गत ते २४ मिनिटांत १०० % चार्ज होईल. Xiaomi ने ३ वर्षे Android अपडेट आणि ४ वर्षे सिक्यूरिटी अपडेटचा दावा केला आहे.

मराठीतील सर्व तंत्रज्ञान ( Tech ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Xiaomi 12 pro with three 50mp camera first sale start know price and features prp

ताज्या बातम्या