scorecardresearch

Premium

शाओमीने लॉन्च केला Civi 3 स्मार्टफोन; ३२ मेगापिक्सलचे दोन सेल्फी कॅमेरे आणि OLED डिस्प्लेसह मिळणार…, जाणून घ्या किंमत

या फोनमध्ये ४,५०० mAh क्षमतेची बॅटरी आणि ६७W चा फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.

xiaomi launch xiaomi civi 3 in china
शाओमीने लॉन्च केला Civi 3 स्मार्टफोन – (प्रातिनिधिक छायाचित्र – Indian Express)

Xiaomi एक लोकप्रिय मोबाईल उत्पादक कंपनी आहे. आपल्या ग्राहकांसाठी कंपनी नवनवीन स्मार्टफोन लॉन्च करत असते. शाओमी कंपनीने आपला Xiaomi Civi 3 हा नवीन स्मार्टफोन लॉन्च केला आहे. या फोनमध्ये MediaTek Dimensity 8200 SoC प्रोसेसर देण्यात आला आहे. या फोनची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स बद्दल जाणून घेऊयात.

Xiaomi Civi 3 चे फीचर्स

Xiaomi Civi 3 मध्ये वापरकर्त्यांना ६.५५ इंचाचा फुल एचडी प्लस OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याचे रिझोल्युशन २४०० x १०८० पिक्सल इतके आहे. तसेच रिफ्रेश रेट हा १२० Hz इतका आहे. या फोनच्या डिस्प्लेला कॉर्निंग गोरिला ग्लासचे प्रोटेक्शन मिळते. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये USB टाइप सी पोर्ट, 5G, 4G, ड्युअल सिम सपोर्ट, NFC, Wi-Fi 6, ब्लूटूथ v5.3 आणि GPS असे फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच सेफ्टीसाठी इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. याबाबतचे वृत्त gadgets360 ने दिले आहे.

manoj jarnage patil
“बाकीचं नंतर बघू, आधी माझ्या किडन्या तपासा”, मनोज जरांगेंच्या किडनीचा नेमका घोळ काय?
chandrashekhar bawankule
सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर राजकीय हालचालींना वेग, भाजपाकडून ‘प्लॅन बी’ तयार? बावनकुळे म्हणाले…
Actor Vijay Antony reacts on Daughter Meera suicide
“मी तिच्याबरोबर मेलो,” १६ वर्षीय मुलीच्या आत्महत्येनंतर अभिनेत्याची भावुक पोस्ट; म्हणाला, “जिथे जात, धर्म, पैसा…”
ramdas kadam on uddhav thackeray aaditya
“आदित्यसाहेब आणि त्यांचा बाप…”, रामदास कदमांची टीका; म्हणाले, “…आता दोघंही पळतायत!”

हेही वाचा : VIDEO: टेस्लाच्या आगमनाची शक्यता असतानाच Ola ने आपल्या ‘या’ प्रोजेक्टवर सुरू केले काम; सीईओ म्हणाले, “हा भारतातातील…”

Xiaomi Civi 3 मध्ये १६ जीबी रॅम आणि १ टीबी इनबिल्ट स्टोरेज देण्यात आले आहे. शाओमीचा हा फोन अँड्रॉइड १३ वर आधारित MIUI 14 वर काम करतो. या फोनमध्ये ४,५०० mAh क्षमतेची बॅटरी आणि ६७W चे फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे. या फोनमध्ये तुम्हाला ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप मिळतो. यामध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, ८ मेगापिक्सलचा दुसरा अल्ट्रावाइडचा कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा तिसरा मॅक्रो कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच सेल्फी आणि व्हिडिओसाठी यामध्ये ३२ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि ३२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड असे २ कॅमेरे देण्यात आले.

काय आहे Xiaomi Civi 3 ची किंमत

Xiaomi Civi 3 च्या १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत CNY २,४९९ (२९,३०० रुपये) आहे. तसेच १२ जीबी रॅम आणि ५१२ जीबी व्हेरिएंटची किंमत CNY २,६९९ (सुमारे ३१,६०० रुपये) आणि १६ जीबी रॅम आणि १ टीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत CNY २,९९९ (सुमारे ३५,२०० रुपये) इतकी आहे. हा फोन सध्या कंपनीने चीनमध्ये लॉन्च केला आहे. हा फोन वापरकर्ते dventure Gold, Coconut Grey, Mint Green आणि Rose Purple खरेदी करू शकतात.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व तंत्रज्ञान बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 27-05-2023 at 18:14 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×