अनेकदा बजेटमध्ये लॅपटॉप विकत घेताना आपण जुन्या लॅपटॉपचा पर्याय निवडतो. मुळात जुना लॅपटॉप विकत घेणे, चुकीचे नाही, उलट पैशांची बचत होते आणि तुम्ही पाहिजे तो लॅपटॉप विकत घेऊ शकता पण जुना लॅपटॉप घेताना तुम्ही काही गोष्टी तपासून घ्यायला पाहिजेत.

१. जुना लॅपटॉप विकत घेण्यापूर्वी लॅपटॉपची खरी किंमत जाणून घ्या. त्यानुसार तुम्हाला परवडेल अशा किमतीत जुना लॅपटॉप घ्या.

२. लॅपटॉपमधील प्रोसेसर कोणत्या जनरेशनचा आहे, हे आधी तपासा. नंतरच लॅपटॉप घ्या.

३. जुना लॅपटॉप विकत घेताना लॅपटॉप चांगला तपासून घ्या. लॅपटॉपमध्ये ram वाढवता येतो की नाही, हे तपासून घ्या.

हेही वाचा : Oneplus 10R 5G वर मोठा डिस्काउंट; फक्त ‘एवढ्या’ रुपयांमध्ये खरेदी करा, वाचा सविस्तर…

४. लॅपटॉप विकत घेताना लॅपटॉपच्या प्रत्येक कीबोर्डची बटणे तपासून घ्या. अनेक जण कीबोर्डची बटणे काम करत नसल्यामुळेही लॅपटॉप विकायला काढतात.

५. लॅपटॉपसोबतचे साहित्य जसे की चार्जर आणि बॅटरी व्यवस्थित तपासून घ्या. लॅपटॉप विकत घेण्यापूर्वी समोरच्याकडून लॅपटॉपची पावती मागा. यावरून लॅपटॉप किती जुना आहे, हे तपासू शकता. या पावतीमधील चार्जर आणि बॅटरी नंबरही तपासा, जेणेकरून चार्जर आणि बॅटरी ओरिजनल आहे का, हे तपासू शकता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

६. लॅपटॉपचा स्पीकर, पोर्ट्स, वायरलेस कनेक्टिव्हीटी CD/DVD Drive सोबत डिस्प्लेसुद्धा चेक करा.