हल्लीच्या काळामध्ये प्रत्येकजण स्मार्टफोनचा वापर करतो. मात्र आयफोनपेक्षा अँड्रॉइड स्मार्टफोन स्वस्त असतात. मात्र आयफोनसारखी सिक्युरिटी अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये मिळत नाही. दरम्यान, अँड्रॉइड स्मार्टफोन हे ओपन नेटवर्क आहे ज्यामध्ये हॅकर्स सहज प्रवेश करू शकतात. जर का तुम्ही अँड्रॉइड स्मार्टफोन वापरत असाल तुम्ही तुमच्या फोनमधल्या सेटिंग्जची विशेष काळजी घेणे आवश्यक असते. आज आपण स्मार्टफोनच्या अशा पाच सेटिंग्जबद्दल जाणून घेणार आहोत. ज्या सेटिंग तुमच्या फोनमध्ये बंद ठेवल्यास तुमची प्रायव्हसी आणि डेटा सुरक्षित राहू शकतो.
Location History: तुम्ही फोन वापरत असताना लोकेशन हिस्ट्रीचा पर्याय चालू ठेवा नका कारण तुम्ही करत असलेल्या तुमच्या प्रत्येक कृतीवर गुगल लक्ष ठेवते. त्यानुसार, ते तुम्हाला जाहिरात, हॉटेल, क्लब आणि शॉपिंग मॉल्सची माहिती दर्शवते. लोकेशन हिस्ट्री बंद करण्यासाठी अँड्रॉइड फोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन गुगल अकाउंटवर क्लिक करा. त्यानंतर मॅनेज अकाउंटच्या पर्यायावर क्लिक ‘डेटा एंड प्रायव्हसी’ वर क्लिक करावे. इथे लोकेशन हिस्ट्री सुरु असेल तर ते लगेच पर्याय बंद करावा.
हेही वाचा : Cognizant Layoff: कर्मचाऱ्यांचे टेन्शन वाढले; आता ‘इतक्या’ लोकांची जाणार नोकरी, कारण…
Lock Screen Notification: जर का तुम्हाला तुमचे ईमेल आणि मेसेज कोणीही वाचू नयेत असे वाटत असेल तर तुम्ही तुमच्या फोनच्या लॉकस्क्रीनवर नोटिफिकेशन हाईड करू शकता. म्हणजेच याचा अर्थ असा होतो की जेव्हाही तुम्हाला मेसेज किंवा मेल अलर्ट येईल तेव्हा लॉकस्क्रीनवरील नोटिफिकेशन स्वरूपात आलेला कंटेंट कोणीही नाही. मोबाईलच्या लॉकस्क्रीनवर आलेले नोटिफिकेशन हाईड करण्यासाठी नोटिफिकेशन आणि स्टेट्स बार क्लिक करा. त्यानंतर लॉकस्क्रीनवर क्लिक करून नोटिफिकेशनचा पर्याय व करावे. मोबाईलमध्ये तुम्हाला हा पर्याय do not show नावाने दिसेल.
Near by Device: जर का तुम्ही तुमच्या फोनमधील ‘निअर बाय डिव्हाईस’ सेटिंग ऑन केले असेल तर तो पर्याय देखील बंद करणे आवश्यक आहे. कारण हे सेटिंग ऑन असले तर तुमच्या स्मार्टफोनशी कोणीही कनेक्ट होऊ शकते . त्यामुळे तुमचा फोन हाक होण्याची शक्यता वाढते.
Data Saving: तुमच्या फोनमधील डेटा सेविंग फीचर सुरू असेल तर तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते. कारण ते अॅप्सना बॅकग्राउंडमध्ये इंटरनेट वापरण्याची परवानगी देत नाही. जेव्हा तुम्हाला गरज असते तेव्हा तुम्ही हे फीचर सुरू करू शकता. पान जीवेळेस तुम्हा या फीचरची आवश्यकता नसेल तेव्हा तुम्ही हे फीचर बंद करून ठेवू शकता.
Personalized Ads: गुगल अकाउंटमध्ये जाऊन तुम्ही हे सेटिंगही बंद करू शकता. कारण या फीचरच्या मदतीने गुगल तुम्हाला काय आवडते आणि काय नाही हे दाखवते. हा पर्याय तुम्हाला गुगल अकाउंटमध्ये ‘डेटा अँड प्रायव्हसी’ सेक्शनमध्ये दिसेल.