07 March 2021

News Flash

नोकियाचा आणखी एक स्वस्त आणि मस्त फोन

नोकियाने अलिकडेच नोकिया ‘आशा २१०’ या नवीन पण कमी किंमतीच्या फोनची घोषणा केली आहे. त्याची किंमत चार हजारांच्या आसपास असेल परंतु सुविधा मात्र तुलनेने चांगल्या

| May 10, 2013 01:37 am

नोकियाने अलिकडेच नोकिया ‘आशा २१०’ या नवीन पण कमी किंमतीच्या फोनची घोषणा केली आहे. त्याची किंमत चार हजारांच्या आसपास असेल परंतु सुविधा मात्र तुलनेने चांगल्या आहेत.विशेष म्हणजे व्हॉट्स अ‍ॅप वापरणाऱ्यांसाठी तो वरदान ठरणार आहे. त्याचा कॅमेरा विशेष बटनने कार्यान्वित करता येईल. फोन लॉक असेल तरी हे करता येईल. कमी किमतीत चांगला फोन असे त्याचे वर्णन करता येईल. दुसऱ्या तिमाहीत तो उपलब्ध होणार आहे. चटकन टायपिंगसाठी त्याला क्वेरटी कीपॅड आहे. फेसबुक, ट्विटर व जीमेल यांना तो अनुकूल आहे. सोशल नेटवर्किंग हे त्याचे आणखी एक वैशिष्टय़ आहे. त्याची डय़ुअल सिम आवृत्ती भारतात उपलब्ध केली जाणार असून सिंगल सिम आंतरराष्ट्रीय पातळीवर उपलब्ध आहे.
नोकिया आशा २१० ची गुणवैशिष्टय़े
कनेक्टिव्हिटी : ब्लूटूथ २.१ इडीआर
स्क्रीन :  ६.१ से.मी, एलसीडी
कॅमेरा : २मेगापिक्सेल (मागील बाजूस)
सिम : सिंगल व डय़ुअल सिम
ओव्हीजीए रेझोल्युशन : ३२० बाय २४० मेगापिक्सेल
अ‍ॅप : विशेष व्हॉट्स अ‍ॅप बटन
मेमरी : ६४ एमबी (३२ जीबीपर्यंत वाढवता येते)
ऑडिओ जॅक : ३.५ मि.मी
बॅटरी : १२०० एमएएच

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2013 1:37 am

Web Title: one more cheap and best phone by nokia
टॅग : Mobile,Nokia
Next Stories
1 क्रोमाचे स्मार्टफोन
2 सॅमसंग गॅलेक्सी एस ४ आणखी ‘स्मार्ट’!
3 आयपॅडलाच पसंती अधिक!
Just Now!
X